Mahesh Tilekar: निराधार रंभा पवार यांना मिळणार छप्पर; दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी पुढे केला मदतीचा हात

डोक्यावर नीट छप्पर नाही आता पुढं कसं होणार या चिंतेत असणाऱ्या रंभा बाई पवार यांना मराठी तारका प्रॉडक्शनचे निर्माता, दिग्दर्शक महेश टिळेकर (Mahesh Tilekar) आणि त्यांचे मित्र वास्तू शिल्प डेव्हलपरचे नितीन धिमधिमे यांनी मदतीचा हात दिला आहे.

Mahesh Tilekar: निराधार रंभा पवार यांना मिळणार छप्पर; दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी पुढे केला मदतीचा हात
महेश टिळेकर स्वखर्चाने निराधार रंभा पवार यांना देणार घर Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 12:20 PM

पुण्यातील (Pune) अप्पर इंदिरा नगर मधील ओटा वसाहतीत राहणाऱ्या 65 वर्षांच्या रंभा पवार (Rambha Pawar) यांच्यावर नियतीने बालपणापासूनच आघात केले. येणाऱ्या परिस्थितीला तोंड देत जगण्यासाठी असलेल्या संघर्षामुळे आता उतार वयात त्या हतबल झालेल्या आहेत. वयाच्या बाराव्या वर्षी एका अपघातात रंभा बाईंचा एक डोळा कायमचा निकामी झाला. घरच्या गरीबीमुळे काबाडकष्ट करत आई वडिलांनी त्यांचे लग्न लावून दिले. लग्नानंतर वर्षभरात पतीने त्यांना सोडून देत दुसरे लग्न केले. एकट्या पडलेल्या रंभा पवार माहेरी आश्रयाला आल्या. आई वडिलांचा आणि भावाचा आधार मिळाला तरी दारोदार जाऊन जुने कपडे गोळा करून त्या बदली छोटी भांडी देण्याचा व्यवसाय करू लागल्या. डोक्यावर नीट छप्पर नाही आता पुढं कसं होणार या चिंतेत असणाऱ्या रंभा बाई पवार यांना मराठी तारका प्रॉडक्शनचे निर्माता, दिग्दर्शक महेश टिळेकर (Mahesh Tilekar) आणि त्यांचे मित्र वास्तू शिल्प डेव्हलपरचे नितीन धिमधिमे यांनी मदतीचा हात दिला आहे.

एके दिवशी डोक्यावर ओझं घेऊन ट्रेनमध्ये चढत असताना पाय घसरून त्या खाली पडल्या सुदैवानं जीव वाचला पण शरीराला गंभीर इजा झाल्यामुळे तीन वर्षे त्या चालू शकल्या नाहीत. त्यावेळी भावानं त्यांना खूप जपलं. काही दिवसांनी आई वडिलांचे निधन झाले आणि काही वर्षातच पाठोपाठ एकुलता एक हक्काचा आधार असणारा भाऊ पण जग सोडून गेला. आई वडिलांचं घर असलेल्या एका छोट्या खोलीत राहून पोटापाण्यासाठी बाहेर साफसफाईचे काम रंभाबाई पवार करत असताना आजार उद्भवला. डायबिटिजमुळे शरीर साथ देत नाही. शरीराप्रमाणे जुन्या मातीच्या घराच्या भिंतीही खचल्या आहेत. छपराचे लोखंडी पत्रे गंजल्यामुळे पावसाळ्यात त्यातून पडणाऱ्या पाण्यामुळे संपूर्ण खोलीत पाणी साचते. अशा अवस्थेत न झोपता रात्र त्या जागून काढतात. घर दुरुस्तीसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चासाठी त्यांच्याकडे पैसा नाही. अशात महेश टिळेकर आणि नितीन धिमधिमे हे त्यांची मोठी मदत करत आहेत.

रंभा बाई पवार या जेष्ठ महिलेची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या परिस्थितीची माहिती घेऊन रंभाबाईंना स्वखर्चाने घर बांधून देण्याचा निर्णय महेश टिळेकर आणि नितीन धिमधिमे यांनी घेतला आहे. या कार्याबद्दल दोघांचे सोशल मीडियावर कौतुक होते आहे.

हे सुद्धा वाचा

लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.