Disha Patani | ‘हिला कोणीतरी योग्य दिशा..’; गंगा आरती करताना दिशा पटानीचे कपडे पाहून भडकले नेटकरी

आता टायगरशी ब्रेकअप झाल्यानंतर दिशा एका जिम ट्रेनरला डेट करत असल्याचं कळतंय. दिशाला अनेकदा या जिम ट्रेनरसोबत पाहिलं गेलंय. दिशाच्या या मिस्ट्री मॅनचं नाव ॲलेक्झांडर ॲलेक्स आहे.

Disha Patani | 'हिला कोणीतरी योग्य दिशा..'; गंगा आरती करताना दिशा पटानीचे कपडे पाहून भडकले नेटकरी
Disha PataniImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 21, 2023 | 2:46 PM

मुंबई : अभिनेत्री दिशा पटानी तिच्या परफेक्ट फिगर आणि फिटनेससाठी ओळखली जाते. दिशाने बॉलिवूडमध्ये मोजक्या चित्रपटांमध्ये काम केलंय. मात्र तिच्या कपड्यांच्या स्टाईलमुळे ती सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. बिकिनी लूक, मिनी ड्रेस, शॉर्ट ड्रेस अशा कपड्यांमध्येच तिला नेहमी पाहिलं जातं. अनेकदा तिला तिच्या कपड्यांच्या निवडीमुळे ट्रोलदेखील केलं जातं. सध्या याच कारणामुळे दिशा पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. वाराणसी दौऱ्याचे तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील काही फोटोंमध्ये ती वाराणसीच्या घाटावर गंगा आरती करताना दिसतेय. मात्र गंगा आरती करताना तिचे जे कपडे घातले आहेत, त्यावरून तिच्यावर जोरदार टीका होत आहे.

वाराणसीत गंगा आरती करताना दिशाने क्रॉप टॉप आणि त्यावर शॉल घेतला होता. दिशा पटानीच्या फॅन क्लबने तिचे व्हिडीओ आणि फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये तिचा लूक स्पष्ट पहायला मिळतोय. काळ्या रंगाचा क्रॉप टॉप, त्याखाली स्वेटपँट्स आणि शॉल असा तिचा लूक आहे. यावरून अनेकांनी तिला ट्रोल केलंय.

हे सुद्धा वाचा

‘पू बनी पार्वती’ असं एकाने लिहिलंय. तर ‘इथेही तिने क्रॉप टॉप घातलाय का’, असा सवाल दुसऱ्या युजरने केला. ‘दिशाला कोणीतरी योग्य दिशा दाखवा’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय. काही दिवसांपूर्वी एका पुरस्कार सोहळ्यातही तोकडे कपडे घातल्यामुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती. त्या ड्रेसमुळे दिशाला बऱ्याच टीकांचा सामना करावा लागला होता.

Disha Doing Ganga Pooja at Varanasi by u/bollyfanboi in BollyBlindsNGossip

दिशा लवकरच अभिनेता सूर्यासोबत एका चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं दिगदर्शन सिरुथई शिवाने केलंय. सुरुवातीला या चित्रपटाचं नाव ‘सुरिया 42’ असं ठेवण्यात आलं होतं. याशिवाय ती करण जोहरच्या ‘योद्धा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिशाच्या हाती ‘प्रोजेक्ट के’ हा चित्रपटसुद्धा आहे. यामध्ये ती दीपिका पदुकोण, प्रभास आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून दिशा तिच्या खासगी आयुष्यामुळेही सोशल मीडियावर चर्चेत आहे. ती अभिनेता टायगर श्रॉफला डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र या दोघांनी कधी माध्यमांसमोर त्याची कबुली दिली नव्हती. आता टायगरशी ब्रेकअप झाल्यानंतर दिशा एका जिम ट्रेनरला डेट करत असल्याचं कळतंय. दिशाला अनेकदा या जिम ट्रेनरसोबत पाहिलं गेलंय. दिशाच्या या मिस्ट्री मॅनचं नाव ॲलेक्झांडर ॲलेक्स आहे. ॲलेक्झांडर हा दिसायला जितका हँडसम आणि डॅशिंग आहे, तितकाच तो फिटनेस फ्रीकसुद्धा आहे.

ॲलेक्झांडरचं इन्स्टाग्राम अकाऊंट हा दिशाच्याच फोटो आणि व्हिडीओंनी भरलेला पहायला मिळतो. दिशा आणि ॲलेक्झांडरची भेट जिममध्ये झाल्याचं कळतंय. हे दोघं एकत्र वर्कआऊट करायचे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.