आमिर खान याने केलेल्या एका गोष्टीमुळे कोपऱ्यात तासनतास रडली ‘ही’ अभिनेत्री
आमिर खान याच्यामुळे अभिनेत्रीच्या आयुष्यात अडचणी? अभिनेत्याने केलेल्या एका गोष्टीमुळे कोपऱ्यात तासनतास रडली, त्यानंतर मात्र तिच्यासोबत जे झालं...
Aamir Khan and Divya Bharti : बॉलिवूडमध्ये अशा अनेक घटना घडल्या ज्या आजही चर्चेत आहेत. एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्री दिव्या भारती (Divya Bharti) हिने एका रात्रीत बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. दिव्या भारती आज या जगात नसली तरी, कमी वयात इंडस्ट्रीमध्ये कमावलेलं नाव आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. (divya bharti death cause) दिव्याने बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत काम केलं. पण अभिनेता आमिर खान (Aamir Khan ) याच्यासोबत घडलेल्या एका गोष्टीचा खुलासा अनेक वर्षांपूर्वी खुद्द दिव्याने मुलाखतीत केला. आज अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त आमिर आणि दिव्यामध्ये झालेल्या वादाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळे अभिनेत्री बाथरुममध्ये तासनतास रडत बसली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, लंडनमध्ये झालेल्या एका शोमध्ये दिव्या तिच्या डान्स स्टेप्स विसरली होती. ज्यामुळे आमिर खान नाराज झाला होता. यावर एका मुलाखतीत दिव्या म्हणाली, ‘तेव्हा आमिर खान याचा ॲटीट्यूड योग्य नव्हता. आमिर अनुभवाने मोठा असला तरी त्याचा अंदाज वाईट होता. मी आमिर याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. असं शोच्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं.’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मी आमिरकडे दुर्लक्ष केलं किंवा नाही केलं काय फरक पडतो? मी तर कामय त्याचा सर म्हणून उल्लेख केला. मी कधीही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं नाही. तेव्हा मी इतकी त्रस्त होते की, मी बाथरुममध्ये तासनतास रडत बसली होती. पण कोणत्याही परिस्थितीत मला डान्स करायचा होता, कारण मी पैसे घेतले होते. अशात सलमान खान याने मला समजावलं ज्यामुळे मी पूर्ण आत्मविश्वासाने परफॉर्म करु शकली.’ असं खुद्द अभिनेत्री म्हणाली.
एवढंच नाही तर, अभिनेत्रीच्या आईने देखील दिव्या आणि आमिर यांच्या वादाबद्दल मोठं वक्तव्य केलं. ‘आमिर खान याच्यामुळे ‘डर’ सिनेमात दिव्याच्या जागी अभिनेत्री जुही चावला हिला संधी देण्यात आली. १९९३ साली प्रदर्शित झालेल्या सिनेमात शाहरुख खान याच्या जागी आमिर मुख्य भूमिकेत दिसणार होता. जेव्हा सिनेमाची ऑफर आमिर याला मिळाली, तेव्हा सिनेमात दिव्या मुख्य भूमिकेत होती.’
त्यानंतर सिनेमा दिग्दर्शकांनी सिनेमात जुही चावला हिला मुख्य भूमिका देण्याचा निर्णय घेतला. पण आमिर देखील सिनेमातून बाहेर झाला आणि शाहरुख मुख्य भूमिकेत झळकला. आमिर खानमुळे ‘डर’ सिनेमात संधी न मिळाल्यामुळे दिव्या नाराज होती. असं वक्तव्य अभिनेत्री दिव्याच्या आईने एका मुलाखतीत केलं. शाहरुख खान आणि जुही चावला स्टारर ‘डर’ सिनेमाला रुपेरी पडद्यावर चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळालं.