Marathi Movie : नव्या विचारांसह ‘मेरे देश की धरती’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

दोन इंजिनिअर तरुण स्वत:ची नोकरी करत असताना, काहीतरी वेगळे करून दाखवण्याची उर्मी जपण्यासाठी कसे शेतकरी बनतात, याबद्दल हलकी फुलकी रंजक कथा ‘मेरे देश की धरती... देश बदल रहा है’ या चित्रपटातून उलगडणार आहे.

Marathi Movie : नव्या विचारांसह ‘मेरे देश की धरती’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
वैशाली सरवणकर यांची निर्मिती असलेला 'मेरे देश की धरती' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे,
Follow us
| Updated on: Jan 29, 2021 | 7:02 PM

मुंबई : ‘प्यार का पंचनामा’, ‘टॉयलेट एक प्रेम कथा’, ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटांसोबत ‘मिर्झापुर’, ‘बिच्छू का खेल’ या वेबसिरीजमध्ये झळकलेल्या दिव्यांदू शर्मानं आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. अल्पावधीतच आपल्या अभिनयाची छाप उमटवून हटके भूमिका साकारणारा हा अभिनेता कार्निवल मोशन पिक्चर्सच्या आगामी ‘मेरे देश की धरती’ या हिंदी चित्रपटातही एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. वैशाली सरवणकर यांची निर्मिती असलेला ‘मेरे देश की धरती’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे (divyendu sharma upcoming marathi movie mere desh ki dharti).

दोन इंजिनिअर तरुण स्वत:ची नोकरी करत असताना, काहीतरी वेगळे करून दाखवण्याची उर्मी जपण्यासाठी कसे शेतकरी बनतात, याबद्दल हलकी फुलकी रंजक कथा ‘मेरे देश की धरती… देश बदल रहा है’ या चित्रपटातून उलगडणार आहे.

दिव्येंदूचं मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण

आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना दिव्यांदू सांगतो कि, ‘मला खूप अभिमान वाटतो की, मी शेतकऱ्याच्या एका वेगळ्या भूमिकेत काम करू शकलो. आज आपल्या देशात असंख्य शेतकरी खडतर मेहनत करून सुद्धा पोटभर जेवण करू शकत नाहीत. हे चित्र नव्या विचारांनी बदललं जाऊ शकतं. त्यासाठी तरुण नेतृत्वानं पुढे येऊन काहीतरी करण्याची गरज आहे, हा संदेश देणारा हा चित्रपट आणि तशा धाटणीची माझी भूमिका रसिकांना नक्की आवडेल असा विश्वास व्यक्त करतो.’ दिव्यांदू शर्मा सोबत या चित्रपटात अनंत विधात आणि अनुप्रिया गोयंका या आघाडीच्या कलाकारांसोबत ब्रिजेंद्र काला, राजेश शर्मा, अतुल श्रीवास्तव, फारुख झफर या प्रतिभावान कलाकारांच्यासुद्धा भूमिका आहेत.

‘मेरे देश की धरती’ या चित्रपटाची संकल्पना डॉ. श्रीकांत बासी यांची आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन फराझ हैदर यांनी केलं आहे. संवाद पियुष मिश्रा यांनी लिहिले आहेत. चित्रपटाला साजेसं संगीत विक्रम मॉण्टेरोज यांनी दिले असून छायांकन हरी वेदांतम यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन पवन आणि बॉब यांचे आहे.

(divyendu sharma upcoming marathi movie mere desh ki dharti)

हेही वाचा :

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.