Bigg Boss 14 | दिवाळीनिमित्ताने घरात ‘कव्वाली’ची मैफिल, स्पर्धकांची एकमेकांवर तूफान शेरेबाजी!
‘बिग बॉस 14’च्या 'वीकेंड का वार'च्या सुरूवातीला घरातील लोक दिवाळी सेलिब्रेशनच्या मूडमध्ये दिसले.
मुंबई : दिवाळीनिमित्त ‘बिग बॉस 14’च्या (Bigg Boss) घरात बरेच बॉम्ब फुटताना दिसले. सणाच्या निमित्ताने घरात बरीच धमाल मस्ती पाहायला मिळाली. ‘बिग बॉस 14’च्या ‘वीकेंड का वार’च्या सुरूवातीला घरातील लोक दिवाळी सेलिब्रेशनच्या (Diwali Celebration) मूडमध्ये दिसले. पारंपरिक भारतीय लूक तसेच डोक्यावर कव्वाली टोपी परिधान करुन स्पर्धकांनी सलमान खानचे स्वागत केले. तर, दिवाळी निमित्ताने घरात कव्वालीची मैफिल रंगली होती. राहुल वैद्य आणि जान कुमार सानू या दोघांनीही ‘कव्वाली’ सादर करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले (Diwali Celebration 2020 At Bigg Boss 14 House).
‘कव्वाली’च्या निमित्त साधत घरातील स्पर्धकांनी एकमेकांवर तूफान शेरेबाजी केली. ‘कव्वाली’च्या मूडमध्ये दोन्ही टीमच्या स्पर्धकांनी एकमेकांविरोधात बरीच टीका केली. यातूनच कविता आणि एजाज यांनी एकमेकांबद्दलचा राग देखील व्यक्त केला. या कव्वालीदरम्यान राहुल आणि जान यांच्यात कमालीची जुगलबंदी दिसली. होस्ट सलमान खाननेही या मजेदार कव्वालीचा आनंद लुटला.
Jab sarcasm or singing ka hoga milan, toh kya hoga iska result?#BB14 #BiggBoss2020 #BiggBoss14 #WeekendKaVaar #HappyDiwali @BeingSalmanKhan pic.twitter.com/XSgtiabYnA
— COLORS (@ColorsTV) November 15, 2020
(Diwali Celebration 2020 At Bigg Boss 14 House)
गुलाब जामुन यांचे गैरसमज
‘कव्वाली’ मैफिलीनंतर सलमान खानने घरातील सदस्यांना एक नवीन टास्क दिला. या टास्कचे नाव ठेवण्यात आले होते ‘गलतफहमी के गुलाबजामुन’. या टास्कमध्ये घरातील सर्व स्पर्धकांना एकमेकांचे गैरसमजूती सांगून गुलाबजामुन खायला देतात. या टास्कमध्ये अली गोनीने जास्मीन भसीनला, एजाज खानने निक्की तंबोलीला, जास्मीन भसीनने रुबीना दिलैक, राहुल वैद्यने एजाज खानला, एजाज खानने पवित्र पुनिया, जान कुमार सानूने निक्की तंबोलीला, पवित्रा पुनियाने निक्की तंबोलीला, रुबीना दिलैकने निक्की तंबोलीला तर, कविता कौशिकने पवित्रा पुनियाला हे गुलाब जामुन खाऊ घातले (Diwali Celebration 2020 At Bigg Boss 14 House).
Aaj qawwaali ki aad mein hogi teekhe taano ki barsaat.#BB14 #BiggBoss2020 #BiggBoss14 #WeekendKaVaar #HappyDiwali @BeingSalmanKhan pic.twitter.com/abnkDxphFG
— COLORS (@ColorsTV) November 15, 2020
(Diwali Celebration 2020 At Bigg Boss 14 House)
रुबीनाचा जास्मीनवर राग
रुबीनाच्या ‘आत्मकेंद्री’ वृत्तीमुळे जास्मीनने तिला ‘गलतफहमी के गुलाबजामुन’ खाऊ घातले. ज्यानंतर रुबीना जास्मीनवर चिडली. एपिसोडच्या शेवटी जास्मीनने रुबीनाची माफी देखील मागितली. पण, रुबीनाने तिला माफ करण्यास नकार दिला.
शार्दुल पंडित ‘बेघर’
या आठवड्यात शार्दुल पंडित घरातून ‘बेघर’ झाला आहे. यावेळी सलमान खानने मतमोजणी सांगितली. सलमान खान म्हणाला की, रुबीनापेक्षा शार्दुलला कमी मते मिळाली. परंतु, या दोघांच्या मतात फार कमी अंतर होते. यावेळी सलमान खान म्हणाला की, शार्दुलची आई आजारी आहे. यामुळे शार्दूल जेव्हा घरातून बाहेर जाईल, तेव्हाच त्याच्या आईबरोबर वेळ घालवू शकेल. यावेळी शार्दुलच्या आईसाठी प्रार्थना करण्याची विनंतीही सलमानने प्रेक्षकांना आणि स्पर्धकांना केली.
.@shardulpandit11 ho gaye hain aaj ghar se bheghar.#BB14 #BiggBoss2020 #BiggBoss14 #WeekendKaVaar #HappyDiwali @BeingSalmanKhan pic.twitter.com/S3zDDSBjZq
— COLORS (@ColorsTV) November 15, 2020
(Diwali Celebration 2020 At Bigg Boss 14 House)