‘कावाला’ गाण्यावर ‘दिया और बाती हम’ फेम अभिनेत्रीचा डान्स पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात!

'कोणीतरी हिचा डान्स बंद करा', असं एकाने लिहिलं. तर 'डान्स चांगला करतेस फक्त तो पोस्ट करत जाऊ नकोस' असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. 'मॅडम तुम्हाला डान्स करायची काय गरज आहे', असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे. 'इतका वाईट डान्स आजवर पाहिला नव्हता' अशा शब्दांत युजर्सनी टीका केली आहे.

'कावाला' गाण्यावर 'दिया और बाती हम' फेम अभिनेत्रीचा डान्स पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात!
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री जोरदार ट्रोलImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 10, 2023 | 2:12 PM

मुंबई | 10 ऑगस्ट 2023 : ‘दिया और बाती’ या मालिकेत संध्या राठी या संस्कारी सुनेची भूमिका साकारून अभिनेत्री दीपिका सिंह घराघरात पोहोचली. मालिकेत सोज्वळ आणि साधी असलेल्या संध्याचा खऱ्या आयुष्यातील लूक पूर्णपणे वेगळा आहे. दीपिका सोशल मीडियावर खूप सक्रिय असून दररोज ती चाहत्यांसोबत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. काही फोटो आणि व्हिडीओमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज पहायला मिळतो. मात्र या सर्वात सर्वाधिक चर्चा होते, ती म्हणजे दीपिकाच्या डान्सची. विविध ट्रेंडिंग गाण्यांवर ती डान्सचे व्हिडीओ शूट करून इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर करते. मात्र अनेकदा तिच्या डान्सला नेटकऱ्यांकडून ट्रोल केलं जातं. असंच काहीसं पुन्हा एकदा घडलं आहे. दीपिकाचा नवा व्हिडीओ पाहून काही नेटकऱ्यांनी थेट डोक्याला हात लावला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तमन्ना भाटियाच्या ‘कावाला’ या तेलुगू गाण्याची खूप क्रेझ पहायला मिळतेय. या गाण्यावर सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण डान्सचे व्हिडीओ शूट करत सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. दीपिकानेही स्वत:च्या डान्सचा व्हिडीओ पोस्ट केला, मात्र त्यावर अनेकांनी तिची खिल्ली उडवली आहे. या व्हिडीओमध्ये दीपिका ‘कावाला’ गाण्यावर तमन्नाचे सिग्नेचर स्टेप्स करताना दिसतेय. यावेळी तिने ब्लॅक शॉर्ट टॉप आणि जीन्स परिधान केला आहे. दीपिकाच्या या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

हे सुद्धा वाचा

‘कोणीतरी हिचा डान्स बंद करा’, असं एकाने लिहिलं. तर ‘डान्स चांगला करतेस फक्त तो पोस्ट करत जाऊ नकोस’ असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. ‘मॅडम तुम्हाला डान्स करायची काय गरज आहे’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे. ‘इतका वाईट डान्स आजवर पाहिला नव्हता’ अशा शब्दांत युजर्सनी टीका केली आहे. आपल्या डान्समुळे ट्रोल होण्याची दीपिकाची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही दीपिकाला तिच्या डान्समुळे अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता ती सोशल मीडियावर डान्सचे विविध व्हिडीओ पोस्ट करताना दिसते.

दीपिकाने 2011 मध्ये ‘दिया और बाती हम’ या स्टार प्लस वाहिनीवरील मालिकेतून टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण केलं. यामध्ये तिने संध्याची भूमिका साकारली होती. ही मालिका तब्बल पाच वर्षे चालली होती. अखेर सप्टेंबर 2016 मध्ये या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर 2018 मध्ये ती ‘द रिअल सोलमेट’ या वेब सीरिजमध्ये झळकली. दीपिकाने 2 मे 2014 रोजी तिच्याच मालिकेचा दिग्दर्शक रोहित राज गोयलशी लग्न केलं. 2017 मध्ये मुलाला जन्म दिल्यानंतर तिने अभिनयातून काही काळ ब्रेक घेतला. मध्यंतरीच्या काळात ती शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घेत होती.

' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.