Rajinikanth B’day Special : एवढ्या गोष्टी करा आणि सुपरस्टार रजनीएवढं फिट व्हा !

सुपरस्टार रजनीकांत हे आज 70 वर्षांचे झाले आहेत, मात्र त्यांची उर्जा एखाद्या तरुण्यापेक्षा कमी नाही.(Do this things and Be as fit as superstar Rajinikanth!)

Rajinikanth B’day Special : एवढ्या गोष्टी करा आणि सुपरस्टार रजनीएवढं फिट व्हा !
Follow us
| Updated on: Dec 12, 2020 | 4:25 PM

मुंबई : सुपरस्टार रजनीकांत हे आज 70 वर्षांचे झाले आहेत, मात्र त्यांची उर्जा एखाद्या तरुण्यापेक्षा कमी नाही. वाढतं वय त्यांच्यासाठी फक्त एक संख्या आहे. वयाच्या 70 व्या वर्षीही ते अ‍ॅक्शन चित्रपट करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. डिस्कव्हरी चॅनलवरील ‘In to the Wild’च्या एका एपिसोडमध्ये तुम्हाला रजनीकांतच्या फिटनेसचं गुपितही जाणून घेता येईल. या शोचा होस्ट बीयर ग्रील्स यानंसुद्धा त्यांच्याकडून फिटनेसचं रहस्य जाणून घेतलं आहे. या एपिसोडच्या शूटिंगवेळी रजनीकांत जखमीही झाले होते. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं फिटनेस आणि जीवनशैलीबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया. (Do this things and Be as fit as superstar Rajinikanth!)

रोज सकाळी 5 वाजता उठतात रजनीकांत रजनीकांत यांची दिनचर्या पहाटे पाच वाजता सुरू होते. सकाळी लवकर उठल्यानंतर ते मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्त राहण्यासाठी रोज योग आणि ध्यान करतात. याशिवाय दररोज सकाळी आणि संध्याकाळी जॉगिंग करणे आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी कमीतकमी एक तास ते स्विमिंग करतात.

डायटवर खास लक्ष रजनीकांत आपल्या डायटवर खास लक्ष ठेवतात. यासाठी त्यांनी आवडीच्या गोष्टीही सोडल्या आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की आपण जसं जेवण करतो तसे होतो. त्यामुळे नॉनव्हेज त्यांच्या आवडीचं असूनही त्यांनी 2014 ते सोडलं आहे. आता ते पूर्णपणे व्हेज जेवण करतात. वयाच्या 40 व्या वर्षीनंतरच त्यांनी दूध, साखर, दही आणि तूपाचं सेवन करणं टाळलं आहे. डायटमध्ये ते जीवनसत्त्वे, प्रथिने, फायबर, पोटॅशियम आणि खनिजयुक्त पदार्थ खायला प्राधान्य देतात.

योग्य प्रमाणात झोप रजनीकांत यांचा असा विश्वास आहे की उत्तम आरोग्यासाठी माणसाला योग्य प्रमाणात झोप घेणं जास्त महत्वाचं आहे. यासाठी ते योग्य प्रमाणात झोप घेतात. त्यामुळे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी आणि उत्साही राहण्यासाठी मदत होते.

कारचं खास वेड रजनीकांत यांना सर्व प्रकारच्या गाड्या चालवायला आवडतात. त्याच्याकडे व्हिंटेज अ‍ॅम्बेसेडर, 80 च्या दशकात प्रीमियर पद्मिनी, सिविक, इनोव्हा आणि बीएमडब्ल्यू कार आहेत.नुकतंच त्यांचा एक फोटो व्हायरल झाला होता ज्यामध्ये तो पांढरा कुर्ता पायजामा परिधान करुन लॅम्बोर्गिनी चालवत होते.

प्रत्येक चित्रपटानंतर हिमालय ट्रीप रजनीकांत यांच्या बद्दल अजून एक गोष्ट तुम्हाला माहिती नसेल. ते प्रत्येक चित्रपटाच्या शूटिंगनंतर हिमालयात फिरण्यासाठी जातात, जेणेकरून शरीराला आराम मिळेल आणि चांगली ऊर्जा मिळेल.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.