‘तुझा खर्च लागला वाढू, सांग कितीदा कर्ज काढू…’ हे गाणं तुम्ही आजही गुणगुणता; कुणी लिहिलंय माहित्ये?
लोकशाहीर कुंदन कांबळे यांनी सर्व प्रकारची गाणी लिहिली. (do you know who wrote tujha kharch lagla vadhu song?)
मुंबई: लोकशाहीर कुंदन कांबळे यांनी सर्व प्रकारची गाणी लिहिली. पण लोकगीतं आणि भीमगीतं त्यांची सर्वाधिक लोकप्रिय ठरली. त्यांचं ‘अहो जावई बापू…’ हे गाणं आजही कुठे न् कुठे वाजत असतं. तसंच त्यांचं आणखी एक गाणं आजही वाजत असतं. कोणतं गाणं आहे ते? वाचाच हा किस्सा. (do you know who wrote tujha kharch lagla vadhu song?)
कामगार सभा गाजवणारं गाणं
तुझा खर्च लागला वाढू, सांग कितीदा कर्ज काढू…
शाहीर कुंदन कांबळे यांनी लिहिलेलं हे गाणं स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांनी गायलं होतं. कुंदनदादांच्या लेखणीतून उतरलेल्या या गाण्याने काळाच्या सीमा ओलांडल्या आहेत. 80च्या दशकात लोकप्रिय झालेलं हे गाणं आजही लग्नात हमखास वाजत असतं. खासकरून गावी आणि शहरी भागातील वस्त्यांमध्ये हे गाणं हमखास वाजतंच वाजतं. त्याकाळात तर या गाण्याने धुमाकूळ घातला होता. हे गाणं त्यावेळी रेडिओवर कामगार सभेच्या कार्यक्रमात हमखास वाजलं जायचं. कामगार सभा गाजवणारं गाणं म्हणूनही या गाण्याकडे पाहिलं जातं.
मधुकर पाठकांना आवडलेल्या ओळी
अशी तू उधळी जगावेगळी, बायको मला मिळाली, तुझ्या गं पायी, लाचारीची वेळ आजही आली, आई बापाला आता काय धाडू, सांग कितीदा कर्ज काढू…
‘तुझा खर्च लागला वाढू’ या गाण्यातील या ओळी प्रसिद्ध संगीतकार मधुकर पाठक यांना प्रचंड आवडायच्या. कुंदनदादा भेटल्यावर या गाण्याचा विषय निघाला तर या ओळींबद्दल पाठक आवर्जुन बोलायचेय.
आनंद शिंदेंचा प्रस्ताव नाकारला
कुंदनदादांनी डबल मिनिंगची गाणी गायली. पण कमरेखाली गाणं जाणार नाही, याची त्यांनी काळजी घेतली. त्यामुळे त्यांची गाणी त्या अर्थाने डबल मिनिंगची नसायची. प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी त्यांना दोन कॅसेटसाठी डबल मिनिंगची गाणी लिहायला सांगितली होती. मात्र, आपण आनंद शिंदेंचा हा प्रस्ताव नम्रपणे नाकारला होतात, असं कुंदनदादांनी सांगितलं होतं.
येतेस का राह्यला जागा हाय खाली, नल्लाच्या बाजूला तल्लाची खोली… वरवर कौलं, खालती कोबा, पटकन खोलीचा मिलेल ताबा, घेवादेवाची करू चल बोली, नल्लाच्या बाजूला तल्लाची खोली…
किंवा
अहो जावई बापू, लई नका तापू, आजच्या दिसाला राहून जा, उद्या पोरीला घेऊन जा…
त्यांची ही दोन्ही गाणी डबल मिनिंगची नाही. अशा धाटणीची लोकगीतं त्यांनी लिहिली. पण गाणं कमरेखाली जाणार नाही आणि घरातही वाजलं पाहिजे, याची त्यांनी नेहमीच खबरदारी घेतली.
स्टेजवरच सुनावलं
एकदा गायिका रंजना शिंदेंबरोबर उरणला त्यांचा सामना होता. तिथे त्यांना लाईट गीत (डबल मिनिंगचं गाणं) सादर करण्याची फर्माईश करण्यात आली. तेव्हा त्यांनी असलं गाणं गाण्यास सपशेल नकार दिला. मात्र, आयोजक ऐकेनात, तेव्हा त्यांनी थेट कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांनाच सुनावलं. तुम्हाला लाईट गीतच हवं असेल तर स्टेजवरील बाबसाहेबांचा फोटो काढून टाका नाही तर भीमगीतं ऐका, असं त्यांनी सुनावलं होतं. त्यानंतर आयोजक नरमले. त्यांना चूक लक्षात आली आणि पुढे प्रबोधनाच्या गीतांनी हा कार्यक्रम चांगलाच रंगला. (साभार, आंबेडकरी कलावंत) (do you know who wrote tujha kharch lagla vadhu song?)
संबंधित बातम्या:
संगीतकार पाठक म्हणाले, कसले कवी?, चार ओळी लिहिता येत नाही? आणि ‘हे’ लोकप्रिय गाणं जन्माला आलं
‘फाटकी नोट मना घ्यावाची नाय…’ हे गाणं कुणी लिहिलं? कुठे सूचलं माहीत आहे का?
(do you know who wrote tujha kharch lagla vadhu song?)