Amol Kolhe: ‘अशा वातावरणात शूटींग करणं म्हणजे वेडेपणा’, अमोल कोल्हेंनी सांगितला आग्र्याच्या लाल किल्ल्यातील शूटिंगचा अनुभव

डॉ. अमोल कोल्हे यांचा 'शिवप्रताप गरुडझेप' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. आग्र्याच्या लाल किल्ल्यात या चित्रपटाचं काही शूटिंग पार पडलं. या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा अमोल कोल्हेंनी सांगितला आहे.

Amol Kolhe: 'अशा वातावरणात शूटींग करणं म्हणजे वेडेपणा', अमोल कोल्हेंनी सांगितला आग्र्याच्या लाल किल्ल्यातील शूटिंगचा अनुभव
अमोल कोल्हेंनी सांगितला आग्र्याच्या लाल किल्ल्यातील शूटिंगचा अनुभव Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 02, 2025 | 3:39 PM

डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा ‘शिवप्रताप गरुडझेप’ (Shiv pratap Garudzep) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रक्ताचा एकही थेंब न सांडता आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर औरंगजेबाच्या बलाढ्य मुघल सत्तेचा पोलादी पहारा भेदून केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) आग्र्याहून सुटकेचा प्रसंग जिवंत करणारा हा चित्रपट आहे. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे सांगितला. आग्र्याच्या लाल किल्ल्यात हे शूटिंग पार पाडलं. मात्र तिथं शूटिंग करणं हे अजिबात सोपं नव्हतं. प्रतिकूल परिस्थितीत अमोल कोल्हे यांच्यासह चित्रपटाच्या संपूर्ण टीमने कशा पद्धतीने शूटिंग पार पाडलं, याविषयी त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं.

अमोल कोल्हे यांची पोस्ट-

‘अशा वातावरणात शूटींग करणं म्हणजे वेडेपणा आहे, आग्र्याच्या लाल किल्ल्यात शूटींग? कसं शक्य आहे? अनेकांच्या अनेक शंका… पण प्रत्यक्ष इतिहास जणू 356 वर्षांनंतर त्या घटनेला कॅमेऱ्याच्या लेन्स मधून पाहणार होता. ASI नियमावलीचे पालन करता करता होणारी दमछाक, त्यात 38-40 डिग्री असलं तरी 70% आर्द्रतेमुळे 42-44 वाटणारं तापमान ते ही सकाळी 9 वाजता, चुकून टाचणी विसरली तरी किल्ल्यातून बेस कॅम्पपर्यंत पायपीट, ना बसायला खुर्ची ना पंखा. सावलीसाठी आडोशाला उभं राहावं तर घामाच्या धारा आणि जरा हवेशीर ठिकाणी उभं राहावं तर उन्हाच्या झळा. रोज 4-5 जण अंथरूण धरायचे नाहीतर थेट हॉस्पिटल मध्ये. तरी पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी ‘ बचेंगे तो और भी लडेंगे’ या ईर्षेने शूटिंग सुरु. पण यात खरं कौतुक करायला हवं ते आमच्या टीम मधील सेटिंग बॉईज, स्पॉट बॉईज, लाईट बॉईज, कॉस्च्युम डिपार्टमेंट, डायरेक्शन टीम, कॅमेरा टीम आणि ज्युनिअर आर्टिस्टचं. कारण या सर्व प्रतिकूलतेत ते सर्वजण ठाम होते. महाराजांच्या पेहरावात मी जेव्हा लाल किल्ल्यात पाऊल ठेवलं तेव्हा भारावलेले, अगदी डोळे भरून तो प्रसंग डोळ्यात साठवणारे आणि 356 वर्षांपूर्वी घडलेल्या इतिहासाच्या पुनर्प्रत्ययाचे ते सर्वजण पहिले साक्षीदार होते. ‘Strenght of a Chain is judged by the strength of weakest link in the chain’ या उक्तीप्रमाणे टीमची ताकद दाखवून देत होते आणि आमचा टीम लीडर, आमचा दिग्दर्शक कार्तिक केंढे तर पहाडासारखा त्या प्रतिकूलतेच्या छाताडावर पाय ठेवून उभा होता. मला जाणवत होतं की आपापल्या परीने प्रत्येक मावळा लढत होता आणि प्रत्येकाची प्रेरणा लाल किल्ल्याकडे स्वाभिमानी नजर रोखून ताठ मानेने उभी होती. शतकानुशकं अजरामर प्रेरणा – छत्रपती शिवाजी महाराज,’ असं त्यांनी लिहिलं. यासोबतच त्यांनी एक व्हिडीओसुद्धा पोस्ट केला.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

‘जगदंब क्रिएशन’ प्रस्तुत करीत असलेल्या डॉ. अमोल रामसिंग कोल्हे निर्मित ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत स्वतः डॉ. अमोल कोल्हे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविण्यासाठी सज्ज झाले आहेत. औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले, हा प्रसंग साधासुधा नव्हता. प्रत्यक्ष मृत्यूच्या दारातून निसटून महाराज किल्ले राजगडावर पोहोचले होते. सुटकेचा हा थरार, हा इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा जिवंत केला जाणार आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.