अजय देवगणच्या ऑनस्क्रीन मुलीने दिली ‘गुड न्यूज’; नेटकरी म्हणाले ‘आज विजय साळगावकर खूप खुश..’
2023 हे वर्ष इशिता आणि तिचा पती वत्सलसाठी खूपच खास ठरत आहे. कारण याच वर्षाच्या सुरुवातीला दोघांनी नवीन घर खरेदी केलं. तर दुसरीकडे लग्नाच्या सहा वर्षांनंतर इशिता आई झाली आहे. इशिताने अभिनेता वत्सलशी 28 नोव्हेंबर 2017 रोजी लग्न केलं.
मुंबई | 20 जुलै 2023 : ‘दृश्यम’ फेम अभिनेत्री आणि अभिनेता अजय देवगणची ऑनस्क्रीन मुलगी इशिता दत्ताने बुधवारी चाहत्यांना गोड बातमी दिली. इशिता आणि तिचा पती वत्सल शेठ हे नुकतेच आई-बाबा झाले आहेत. बुधवारी सकाळी तिने मुलाला जन्म दिला. आई आणि बाळ दोघांची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. इशिता पुढील 48 तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णालयात असेल. त्यानंतर शुक्रवारी दिला डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
‘दृश्यम’ या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. या चित्रपटाच्या दोन्ही भागात इशिता दत्ताने अजय देवगणच्या ऑनस्क्रीन मुलीची भूमिका साकारली होती. तिने साकारलेल्या या भूमिकेचं प्रेक्षक-समिक्षकांकडून विशेष कौतुक झालं होतं. विजय साळगावकर (अजय देवगण) आणि त्याच्या चित्रपटातील काही सीन्सवर, डायलॉग्सवर आजही विविध मीम्स व्हायरल होतात. आता इशिता आई झाल्याचं कळताच सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ‘आज विजय साळगावकर खूप खुश असेल’, असंही काहींनी म्हटलंय.
View this post on Instagram
2023 हे वर्ष इशिता आणि तिचा पती वत्सलसाठी खूपच खास ठरत आहे. कारण याच वर्षाच्या सुरुवातीला दोघांनी नवीन घर खरेदी केलं. तर दुसरीकडे लग्नाच्या सहा वर्षांनंतर इशिता आई झाली आहे. इशिताने अभिनेता वत्सलशी 28 नोव्हेंबर 2017 रोजी लग्न केलं होतं. इस्कॉन मंदिरात या दोघांनी लग्न केलं. ‘रिश्तों का सौदागर- बाजीगर’च्या सेटवर या दोघांची पहिली भेट झाली होती. याच सेटवर एकत्र काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले.
2021 मध्ये इशिता गरोदर असल्याच्या चर्चा होत्या. मात्र त्यावेळी इशिताने पुढे येऊन या चर्चांमध्ये काही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं होतं. गेल्या वर्षी तिने ‘दृश्यम 2’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. यामध्ये तिने अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारली होती. अजय देवगण आणि इशिताशिवाय या चित्रपटात श्रिया सरन, अक्षय खन्ना आणि तब्बू यांच्याही भूमिका होत्या.