Drishyam 2 च्या चौथी नापास विजय साळगावकरची तब्बल इतक्या कोटींची संपत्ती; DIG मीरा देशमुख इथेही पडली मागे

विजय साळगावकरला 7 वर्षांनंतरही तुरुंगात टाकण्यास DIG मीरा देशमुख ठरली अपयशी; जाणून घ्या दोघांची संपत्ती..

Drishyam 2 च्या चौथी नापास विजय साळगावकरची तब्बल इतक्या कोटींची संपत्ती; DIG मीरा देशमुख इथेही पडली मागे
तब्बू, अजय देवगणImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Nov 23, 2022 | 1:03 PM

मुंबई: ‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम 2’ या दोन्ही चित्रपटांमध्ये विजय साळगावकरची भूमिका साकारणाऱ्या अजय देवगणने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. चौथी नापास झालेला विजय कशाप्रकारे त्याच्या कुटुंबाला वाचवतो आणि डीआयजी मीरा देशमुखचा (तब्बू) सामना करतो, हे या चित्रपटांमध्ये दाखवण्यात आलं आहे. या सस्पेन्स-थ्रिलर चित्रपटात एका क्षणाला मीरा जिंकणार असं वाटत असतानाच अनपेक्षितपणे विजय तिला मात देतो. अजयने फक्त रिल लाइफमध्येच नाही तर रिअल लाइफमध्येही तब्बूला संपत्तीच्या बाबतीत मागे टाकलं आहे.

अजयची संपत्ती

एका रिपोर्टनुसार, अजयची एकूण संपत्ती जवळपास 298 कोटी रुपयांच्या घरात आहे. तर तब्बूची संपत्ती ही केवळ 25 कोटी रुपये इतकीच आहे. ॲक्शन डायरेक्टर वीरू देवगण यांचा मुलगा अजयचा जन्म 2 एप्रिल 1969 मध्ये पंजाबमध्ये झाला. ‘फूल और कांटे’ या ॲक्शन चित्रपटातून त्याने करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तीन दशकांमध्ये त्याने ड्रामा, रोमान्स, कॉमेडी, थ्रिलर, सस्पेन्स अशा प्रत्येक जॉनरमध्ये हिट चित्रपटं दिली. अजय देवगण त्याच्या आलिशान लाइफस्टाइलसाठीही ओळखला जातो.

एका चित्रपटासाठी किती घेतो मानधन?

चित्रपटांशिवाय विविध जाहिरातींमधून अजयची मोठी कमाई होते. एका ब्रँडच्या जाहिरातीसाठी तो दोन कोटी रुपये मानधन घेतो. तर चित्रपटासाठी तो जवळपास 30 ते 50 कोटींदरम्यान मानधन स्वीकारतो. चित्रपटात फक्त कॅमिओ असला तरी त्यासाठी अजय मोठी रक्कम घेतो. गंगुबाई काठियावाडी या चित्रपटातील छोट्या भूमिकेसाठी त्याने 11 कोटी रुपये तर RRR साठी त्याने 25 कोटी रुपये मानधन घेतलं होतं.

हे सुद्धा वाचा

आलिशान गाड्या आणि बंगले

अजयचा मुंबईत जुहू परिसरात ‘शिवशक्ती’ नावाचा आलिशान बंगला आहे. या बंगल्यात जिम, स्विमिंग पूल, मिनी थिएटर, लायब्ररी अशा सर्व सुविधा आहेत. याशिवाय लंडनमध्येही त्याचं घर आहे. ज्याची किंमत 54 कोटी रुपये इतकी आहे. अजयने 2010 मध्ये प्रायव्हेट जेट खरेदी केला होता. त्याची किंमत जवळपास 84 कोटी रुपये इतकी होती. शूटिंग, प्रमोशन आणि पर्सनल ट्रिपसाठी तो त्याचा वापर करतो.

अजयला महागड्या गाड्यांची आवड आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. त्याच्या कलेक्शनमध्ये टोयोटा सलीका, बीएमडब्ल्यू, रेंज रोव्हर, फरारी, मैसेराटी क्वाट्रोपोर्टे यांचा समावेश आहे. या सर्व गाड्यांची एकूण किंमत 15 कोटींच्या घरात आहे. याशिवाय त्याची 100 कोटींची गुंतवणूकसुद्धा आहे.

तब्बूची संपत्ती

दुसरीकडे ‘दृश्यम’ या चित्रपटात डीआयजी मीरा देशमुखची भूमिका साकारणारी तबस्सुम फातिमा हाश्मी ऊर्फ तब्बूचा जन्म 4 नोव्हेंबर 1971 रोजी हैदराबादमध्ये झाला. तब्बूने 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या देवानंद यांच्या ‘हम नौजवान’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात तिने देवानंद यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. आतापर्यंत तिने 90 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. तिची एकूण संपत्ती 25 कोटी रुपये इतकी आहे.

एका चित्रपटासाठी किती घेते मानधन?

एका चित्रपटासाठी तब्बू जवळपास दोन ते चार कोटी रुपये मानधन घेते. जाहिरातींमधूनही ती समाधानकारक कमाई करते. तब्बू बऱ्याच स्वयंसेवी संस्थांची मदत करते. तर अनेकदा संस्थांना मदत करण्यासाठी ती विविध गेम शोजमध्ये भाग घेते. यातून मिळणारी रक्कम ती दान करते.

तब्बू आणि अजय हे एकमेकांना कॉलेजपासून ओळखतात. कॉलेजमध्येच या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. तब्बूचं एक घर मुंबईत तर एक हैदराबादमध्ये आहे. तर गोव्यातही तिने आलिशान बंगला खरेदी केला आहे.

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.