थेट अमिताभ बच्चन यांनी केला प्राजक्ता माळी हिला व्हिडीओ काॅल, वाचा नेमके काय घडले?
प्राजक्ता माळी ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना प्राजक्ता माळी ही कायमच दिसते. नुकताच प्राजक्ता माळी ही तूफान चर्चेत आलेली दिसत आहे. त्याचे कारणही मोठे आहे.
मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी ही कायमच चर्चेत असते. प्राजक्ता माळी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. प्राजक्ता माळी ही नुकताच कौन बनेगा करोडपती शोच्या 15 व्या सीजनमध्ये झळकलीये. विशेष म्हणजे प्राजक्ता माळी हिला चक्क अमिताभ बच्चन यांनीच व्हिडीओ काॅल केला. त्याचे झाले असे की, मराठमोळा अजय नावाचा मुलगा हा अमिताभ बच्चन यांच्यासोबत कौन बनेगा करोडपती 15 च्या सीजनला थेट अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉसीटवर बसला. यावेळी तो अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे काैतुक करताना दिसला.
सतत अजय याच्या तोंडामध्ये प्राजक्ता माळी हिचे नाव होते. मग काय शेवटी थेट अमिताभ बच्चन यांनीच प्राजक्ता माळी हिला व्हिडीओ काॅल केला. यावेळी प्राजक्ता माळी ही अजय याला थेट म्हणते की, तू जिंक अजय मी स्वत: तुला भेटायला येईल. आम्ही सर्वजण तुझ्या पाठींशी आहोत. यावेळी प्राजक्ता माळी ही अमिताभ बच्चन यांचे देखील धन्यवाद मानताना दिसतंय.
प्राजक्ता माळी ही अमिताभ बच्चन यांना म्हणते की, सर, खरोखरच आज हे जाणून खूप जास्त छान वाटले की, तुम्ही आमचा कार्यक्रम महाराष्ट्राची हास्यजत्रा बघता. या व्हिडीओ काॅलमध्ये बऱ्याच वेळा प्राजक्ता माळी ही थेट मराठी बोलताना देखील दिसली. प्राजक्ता माळी थेट म्हणाली की, मला वाटते की, सातत्याने नवनवीन प्रयोग केले पाहिजेत.
View this post on Instagram
यावेळी प्राजक्ता माळी हिने म्हटले की, मी कायमच योगा करते. पुढे प्राजक्ता म्हणाली की, मुळात म्हणजे आपल्याला ज्याकाही गोष्टी आवडतात, त्या गोष्टी करण्यासाठी माणूस आपोआप वेळ काढतच असतो. प्राजक्ता माळी हिला व्हिडीओ काॅल करून अमिताभ बच्चन यांनी अजय याला सरप्राईज दिले. आता याचाच व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय.
व्हिडीओमधील विशेष बाब म्हणजे अमिताभ बच्चन आणि चाहता अजय याच्यासोबत मस्त गप्पा मारताना प्राजक्ता माळी ही दिसतंय. चाहते या कौन बनेगा करोडपतीच्या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. कौन बनेगा करोडपतीचे यंदा 15 वे सीजन सुरू आहे. हे सीजन देखील चांगलाच धमाका करताना दिसत आहे.