AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ 7 कारणांमुळे अभिषेक – ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाची शक्यता, चौथं कारण हैराण करणारं

Aishwarya Rai - Abhishek Bachchan : 'ही' 7 कारणं ठरु शकतील अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटासाठी कारणीभूत... चौथ्या कारणावर विश्वास बसणं कठीण... सध्या सर्वत्र फक्त आणि फत्त बच्चन कुटुंबातील भांडणांची चर्चा...

'या' 7 कारणांमुळे अभिषेक - ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाची  शक्यता, चौथं कारण हैराण करणारं
Follow us
| Updated on: Dec 20, 2023 | 12:16 PM

मुंबई | 20 डिसेंबर 2023 : अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचं नातं सध्या फार नाजूक झालं आहे… अशी चर्चा सध्या सर्वत्र तुफान रंगत आहे. अभिनेत्री जया बच्चन यांच्यासोबत मतभेद असल्यामुळे ऐश्वर्या हिने सासर सोडून माहेरी जाण्याचा निर्णय घेतला असं सांगण्यात येत आहे. एकेकाळी चाहत्यांना कपल गोल्स देणाऱ्या ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाची चर्चा होत असल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. यावर बच्चन कुटुंब आणि ऐश्वर्या – अभिषेक यांनी मौन बाळगलं आहे. दरम्यान, आठ कारणांमुळे ऐश्वर्या – अभिषेक यांचा घटस्फोटा होऊ शकतो… अशी देखील चर्चा रंगली आाहे. तर जाणून घेऊ ती आठ कारणं आणि त्यातील चौथं कारण फार भयानक आहे.

पहिलं कारण – मुंबईमध्ये ‘सॅम बहादूर’ सिनेमाच्या स्किनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. स्क्रिनिंगसाठी अभिषेक भाचा अगस्त्य नंदा याच्यासोबत पोहोचला. यावेळी कायम पतीसोबत दिसणारी ऐश्वर्या सिनेमाच्या स्किनिंगसाठी उपस्थित नव्हती.

दुसरं कारण – बॉलिवूडचाल प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा याने दिवाळा पार्टीचं आयोजन केलं होतं. याआधी मुकेश अंबानी यांच्या घरी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी ऐश्वर्या लेक आराध्या बच्चन हिच्यासोबत पोहोचली. पण दोन्हीवेळी अभिषेक बच्चन त्यांच्यासोबत नव्हता.

तिसरं कारण – 16 नोव्हेंबर 2023 रोजी आराध्याचा वाढदिवस साजरा झाला पण अभिषेक बच्चन आपल्या मुलीसोबत दिसला नाही. आजोबा अमिताभ बच्चन यांनी देखील नात आराध्या हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्यामुळे बिग बी यांनी सोशल मीडियावर आराध्या हिला शुभेच्छा देण्याचं टाळलं..

चौथं कारण – 1 नोव्हेंबर रोजी ऐश्वर्या हिचा 50 वा वाढदिवस झाला. अभिनेत्रीने वाढदिवस आई आणि लेकीसोबत साजरा केला. तेव्हा बच्चन कुटुंबातील कोणीही ऐश्वर्या हिच्यासोबत नव्हतं. शिवाय अभिषेक याने देखील सोशल मीडियावर ऐश्वर्या हिला तिच्या एकटीचाच फोटो पोस्ट करत शुभेच्छा दिल्या.

पाचवं कारण – दिवाळी साजरी करण्यासाठी प्रत्येक कुटुंब एकत्र येतं. पण ऐश्वर्या हिने दिवाळी बच्चन कुटुंबासोबत साजरी केली नाही. दिवाळीच्या दिवशी ऐश्वर्या जलसामध्ये नव्हती. यामुळे देखील ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला.

सहावं कारण – पॅरिश फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या लेक आराध्या हिच्यासोबत पोहोचली. तेव्हा नव्या नंदा देखील पॅरिश फॅशन वीकमध्ये वॉक केलं. पण पॅरिश फॅशन वीकसाठी जया बच्चन आणि श्वेता बच्चन एकत्र गेल्या. यामुळे देखील बच्चन कुटुंबातील वाद समोर आले.

सातवं कारण – ऐश्वर्याने तिच्या इंस्टाग्रामवर दिवंगत कृष्णराज राय यांचे काही फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये अभिनेत्रीची मुलगी आराध्याही दिसली होती. पण अभिषेक बच्चन दिसला नाही ज्यामुळे पुन्हा एकदा दोघांमधील मतभेदांच्या चर्चा रंगू लागल्या.

भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं..
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं...