Ekta Kapoor | एकता कपूरचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात; म्हणाले ‘दुसऱ्यांमागे लपण्याची वेळ..’

प्रसिद्ध निर्माती एकता कपूरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एकता स्वत:ला अभिनेत्री क्रिस्टल डिसूझाच्या मागे लपवताना दिसत आहे. त्यावरून आणि तिच्या कपड्यांवरून नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलंय.

Ekta Kapoor | एकता कपूरचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात; म्हणाले 'दुसऱ्यांमागे लपण्याची वेळ..'
Ekta KapoorImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 07, 2023 | 1:28 PM

मुंबई | 7 सप्टेंबर 2023 : टेलिव्हिजन क्वीन म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध निर्माती एकता कपूर सध्या तिच्या आगामी ‘थँक्यू फॉर कमिंग’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यामध्ये अभिनेत्री भूमी पेडणेकर, शहनाज गिल, कुशा कपिला, शिवानी बेदी, करण कुंद्रा यांसारखे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलर लाँचनंतर एकता कपूरला मुंबईतल्या एका कार्यक्रमात पाहिलं गेलं. या कार्यक्रमातील तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र या व्हिडिओवरून तिला चांगलंच ट्रोल केलं जातंय.

या व्हिडिओमध्ये एकता कपूर तिची खास मैत्रीण आणि प्रसिद्ध अभिनेत्री क्रिस्टल डिसूझासोबत दिसून येत आहे. या दोघी पापाराझींसमोर फोटोसाठी येतात. त्यांच्या मागे आयुषमान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल 2’ या चित्रपटाचं मोठं पोस्टर दिसून येत आहे. जेव्हा क्रिस्टर आणि एकता फोटोसाठी पापाराझींसमोर येतात तेव्हा एकता तिच्या मागे स्वत:ला झाकण्याचा प्रयत्न करते. हे पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. एकताने तिचा आत्मविश्वास गमावलाय, हे फार वाईट आहे, असे कमेंट्स नेटकरी करत आहेत. अनेकांनी एकताच्या कपड्यांवरूनही टीका केली आहे. जर कम्फर्टेबल नसेल तर असे कपडे का घालायचे, असा सवालही काहींनी केला आहे. एकताने गोल्डन शिमरचा लाँग गाऊन परिधान केला आहे. मात्र या गाऊनच्या फिटिंगमुळे एकता पापाराझींसमोर फोटो काढण्यास इच्छुक नसल्याचं दिसून येत आहे. म्हणूनच फोटो क्लिक करताना ती स्वत: क्रिस्टलच्या मागे लपते.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

एकता कपूरच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचं झाल्यास, ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या यशानंतर ती पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. थँक्यू फॉर कमिंग असं या चित्रपटाचं नाव आहे. यामध्ये भूमी पेडणेकर लग्न आणि बाळासाठी खूप उतावळी असते, मात्र तिला तिच्या पसंतीचा मुलगा भेटत नाही. या चित्रपटात प्रेम, मैत्री आणि रिलेशनशिप या गोष्टींना एका वेगळ्या दृष्टीकोनातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा चित्रपट येत्या 6 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होईल.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.