AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टाईट पँट घातल्याने पोलिसांनी ‘सेक्रेड गेम्स’च्या अभिनेत्रीला घेतलं ताब्यात; त्यानंतर जे घडलं..

अभिनेत्रीने सांगितला 'तो' भयावह अनुभव; वाचून अंगावर येईल काटा

टाईट पँट घातल्याने पोलिसांनी 'सेक्रेड गेम्स'च्या अभिनेत्रीला घेतलं ताब्यात; त्यानंतर जे घडलं..
Elnaaz NorouziImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 28, 2022 | 2:33 PM

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून इराणमधील हिजाबचा (Iran Hijab Protest) वाद चांगलाच पेटला आहे. तेहरानच्या पोलीस कोठडीत 22 वर्षीय महसा अमिनी (Mahsa Amini) या तरुणीचा मृत्यू झाला. महसाने हिजाब योग्य प्रकारे परिधान केला नव्हता, म्हणून तिला पोलिसांनी अटक केली होती. पोलीस कोठडीत तिच्यावर अत्याचार झाल्याचीही माहिती समोर येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही फोटोंमध्ये तिच्या शरीरावर मारहाणीचे घाव दिसत आहेत. अशातच अचानक तिचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. महसाच्या मृत्यूनंतर इराणमधील हिजाबचा वाद आणखी पेटला आहे. यादरम्यान आता इराणमध्ये राहणारी बॉलिवूड अभिनेत्री एलनाज नौरोजी (Elnaaz Norouzi) हिच्या एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. एलनाजचं पूर्ण कुटुंब इराणमध्ये आहे आणि तिचा त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये.

एलनाजने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती इराणमधल्या भयानक परिस्थितीबद्दल बोलताना दिसतेय. इराणमध्ये काय घडतंय हे इतर देशांना दिसू नये, माध्यमांसमोर येऊ नये, यासाठी इंटरनेट कनेक्शन कापल्याचंही तिने सांगितलंय.

हे सुद्धा वाचा

टाइट जीन्स घातल्याने पोलिसांनी घेतलं ताब्यात

एलनाज जेव्हा इराणमध्ये होती, तेव्हा एकदा पोलिसांनी तिलासुद्धा ताब्यात घेतलं होतं. आता जे महसा अमिनीसोबत घडलं, तेच त्यावेळी माझ्यासोबतही घडलं असतं, असं ती म्हणाली. “काही वर्षांपूर्वी मी इराणला गेले होते आणि शेवटच्या दिवशी तेहरानमध्ये होती. मी माझ्या चुलत भावासोबत रस्त्यावर चालत होती आणि अचानक एक महिला माझ्यासमोर आली म्हणाली, “हे काय आहे?” ती नेमकं कशाबद्दल बोलतेय, हे मला कळत नव्हतं. तिने पुन्हा तोच प्रश्न विचारला. मी टाइट जीन्स परिधान केल्याने गश्त-ए-इरशाद मॉरल पोलिसांनी मला ताब्यात घेतलं होतं. मला व्हॅनमध्ये बसवून ते ‘रि-एज्युकेशन’ सेंटर घेऊन गेले होते”, असं तिने सांगितलं.

View this post on Instagram

A post shared by Elnaaz Norouzi (@iamelnaaz)

घडलेल्या घटनेबद्दल ती पुढे म्हणाली, “महसा अमिनीलासुद्धा तिथेच घेऊन गेले होते. त्याठिकाणी मला खूप वेळ थांबवलं होतं. जोपर्यंत माझ्यासाठी कोणी सैल कपडे घेऊन येत नाही, तोपर्यंत त्यांनी मला तिथे बसवून ठेवलं होतं. माझा चुलत भाऊ खूप घाबरला होता. कुटुंबीयसुद्धा भयभीत झाले होते. कारण तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी माझा पासपोर्ट आणि फोन जप्त केला होता. इराणमध्ये या अत्यंत भयावह गोष्टी घडत आहेत. तुमच्या नखांवरील नेलपेंटचा कलर, तुमचा हिजाब, कपडे यांसारख्या क्षुल्लक कारणांवरून पोलीस ताब्यात घेतात.”

रि-एज्युकेशन सेंटरमधील त्या घटनेबद्दल तिने सांगितलं, “तुम्हाला तुरुंगात डांबल्यानंतर ते तुमचे फोटो काढतात. तुमची सर्व माहिती काढून घेतात. तुम्हाला कोणत्या घटनेबद्दल अटक होईल हेच सांगता येत नाही. अनेकदा महिला आणि मुली तिथून परत येऊ शकत नाहीत.”

एलनाज तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर इराणमधल्या या परिस्थितीचे फोटो आणि व्हिडीओ सातत्याने पोस्ट करतेय. तिथल्या परिस्थितीविरोधात आवाज उठवण्याची मागणी ती चाहत्यांना आणि इतर देशांना करतेय.

एलनाजने ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजमध्ये भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘जुग जुग जियो’ या चित्रपटातही ती झळकली होती.

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.