AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एल्विश यादव याने उघडले तोंड, सापांच्या विषाच्या पार्टीमध्ये थेट ‘या’ बाॅलिवूड सेलिब्रिटीचे नाव, गंभीर आरोप

एल्विश यादव हा तूफान चर्चेत आहे. एल्विश यादव याच्यावर अत्यंत गंभीर आरोप हे करण्यात आले. एल्विश यादव हा बिग बाॅस ओटीटी 2 चा विजेता आहे. एल्विश यादव याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

एल्विश यादव याने उघडले तोंड, सापांच्या विषाच्या पार्टीमध्ये थेट 'या' बाॅलिवूड सेलिब्रिटीचे नाव, गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Nov 09, 2023 | 4:41 PM

मुंबई : एल्विश यादव याच्यावर गंभीर आरोप झाले. इतकेच नाही तर सापाच्या विषाच्या पार्टीचे आयोजन एल्विश यादव याच्याकडून केले जात असत. एल्विश यादव याच्यावर झालेल्या आरोपांनंतर खळबळजनक खुलासे झाले. एल्विश यादव याचा शोध पोलिसांनी चार राज्यात घेतला आणि शेवटी त्याला राजस्थानमधून अटक केली. रेव्ह पार्टी प्रकरणात एल्विश यादव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्लीच्या भागात रेव्ह पार्टी एल्विश यादव याच्याकडून ठेवण्यात आली. या पार्टीमध्ये सापाच्या विषाची नशा केली जात असतं.

एल्विश यादव याला पोलिसांकडून अटक झाल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणल्याचे बघायला मिळाले. एल्विश यादव याने मुंबईमध्ये देखील रेव्ह पार्टींचे आयोजन केले असल्याचा दावा काही रिपोर्टमध्ये करण्यात आले. बाॅलिवूडच्या कलाकारांच्या देखील अशाप्रकारच्या गुप्त पार्ट्या झाल्याचे रिपोर्टमध्ये सांगितल्यापासून मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळाले.

आता नुकताच पोलिसांसमोर एल्विश यादव याने धक्कादायक खुलासा केलाय. थेट बाॅलिवूड कलेक्शन यामधून पुढे आले. आता या प्रकरणात काही धक्कादायक खुलासे होऊ शकतात. थेट या प्रकरणात बाॅलिवूडमधील एका गायकाचे नाव पुढे आल्याने मोठा धक्का बसलाय. शेवटी पोलिसांसमोर एल्विश यादव याने काही गोष्टी कबुल केल्याचे सांगितले जात आहे.

एल्विश यादव याने चौकशीदरम्यान सांगितले की, पार्टीसाठी सापांची व्यवस्था बॉलिवूड गायक फाजिलपुरियाने केली होती. गायक फाजिलपुरिया याचे नाव आल्याने मोठी खळबळ निर्माण झालीये. यावर आता थेट गायक फाजिलपुरिया याने खुलासा केलाय. फाजिलपुरिया याने सांगितले की, आपला आणि रेव्ह पार्टीचा काहीच संबंध नाहीये.

पुढे फाजिलपुरिया म्हणाला की, होय एक शूटसाठी सापांचा पुरवठा केला होता. फाजिलपुरियाने हे देखील कबुल केले आहे की, तो एल्विश यादव याला ओळखतो आणि त्यांची ओळख एका सूटदरम्यानच झाली. बुधवारी पोलिसांकडून एल्विश यादव याची चाैकशी तब्बल तीन तास करण्यात आली. सतत पोलिस एल्विश यादव याची चाैकशी करताना दिसत आहेत. अजून काही मोठे खुलासे होण्याची दाट शक्यता देखील आहे.

सापांच्या विषाच्या पार्टीमध्ये काही बाॅलिवूड कलाकारांचा देखील समावेश असल्याचे सांगितले जात आहे. मुंबईमध्ये अशा पार्टींचे कधी आणि कुठे आयोजन करण्यात आले याबद्दल देखील पुढील काही दिवसांमध्ये खुलासे होण्याची दाट शक्यता आहे. इतके नाही तर एल्विश यादव हा कोणत्या कलाकारांच्या संपर्कात होता याचा तपास सुरू आहे.

पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रस्त्यावर अन् भारतीयांना आर्त हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रस्त्यावर अन् भारतीयांना आर्त हाक.
पर्यटकांच्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी काश्मिरी चिमुकला सरसावला
पर्यटकांच्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी काश्मिरी चिमुकला सरसावला.
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली.
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले.
अतिरेक्यांची बंदूक हिसकवण्याच्या प्रयत्नात आदिलनं गमावला जीव, घडलं काय
अतिरेक्यांची बंदूक हिसकवण्याच्या प्रयत्नात आदिलनं गमावला जीव, घडलं काय.
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट.