एल्विश यादवच्या अडचणीत वाढ, 14 दिवसांची कोठडी, ‘या’ कायद्यानुसार 10 वर्षाचा तुरुंगवास आणि..
एल्विश यादव याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. एल्विश यादव याला पोलिसांकडून अटक करण्यात आलीये. एल्विश यादव याच्यावर गंभीर आरोप करण्यात आली आहेत. एल्विश यादव याला पोलिसांनी अटकही केलीये. आता एल्विश यादवच्या प्रकरणात मोेठे अपडेट पुढे आले.
मुंबई : बिग बाॅस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादव हा सध्या तूफान चर्चेत आलाय. एल्विश यादव याच्यावर काही दिवसांपूर्वीच अत्यंत गंभीर आरोप हे करण्यात आले. एल्विश यादव याच्यावर करण्यात आलेल्या आरोपांनंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. आज पोलिसांनी एल्विश यादव याला चाैकशीसाठी बोलवले. त्यानंतर काही तास ही चाैकशी झाली. मात्र, चाैकशीनंतर पोलिसांनी थेट एल्विश यादव याला अटक केली. एल्विश यादव याला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केले. यानंतर कोर्टाने आता एल्विश यादव याला 14 दिवसांची पोलिस कोठडी ही सुनावली आहे.
एल्विश यादव याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. एल्विश यादव याला किमान 10 वर्षांची शिक्षा या प्रकरणात होऊ शकते. यामुळे याचा थेट परिणाम हा एल्विश यादव याच्या करिअरवर देखील होऊ शकतो. एल्विश यादव याच्यावर अनेक गंभीर कलम लावण्यात आलीत. यामुळे या प्रकरणात एल्विश यादव याच्या समस्यांमध्ये मोठी वाढ होऊ शकते.
एनडीपीएस कलमनुसार एल्विश यादव याच्यावर कारवाई ही होऊ शकते. याला नारकोटिक ड्रग्स अॅन्ड साइकोट्रोपिक सब्सटेंस कलम 1985 म्हटले जाते. या कलमाचा वापर हा अंमली पदार्थ बनवणे, त्याला खरेदी करणे किंवा विकणे आणि सेवण करणे यासाठी वापर होतो. या कलमनुसार 10 ते 20 वर्षांची जेल आणि 1 ते 2 लाखांचा दंड होऊ शकतो.
वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये 66 कलमे आणि 6 नुसार वन्य प्राणी आणि पक्ष्यांना संरक्षण मिळते. यामध्ये तब्बल 3 वन्यजीवांचा समावेश होतो. बिबट्या, वाघ, मोर, पोपट, अस्वल, तितर, घुबड, बाजा, उंट, माकड, हत्ती, हरिण, पांढरा उंदीर, साप, मगर, कासव यांचा समावेश होतो. यामुळे एल्विश यादव हा चांगलाच अडकलेला दिसतोय.
एल्विश यादव याच्यावर रेव्ह पार्टीचे आयोजन करण्याचा आरोप हा करण्यात आलाय. हेच नाही तर त्याच्या या पार्टीत विदेशी मुली आणल्या जात असल्याचे सांगितले गेले. एल्विश यादव याच्या या पार्टीतून सापांच्या विषाचा नशा ही केली जात असत. एल्विश यादव याच्या पार्टीत येणाऱ्या लोकांकडून तगडे पैसे घेतले जायचे. आता हेच प्रकरण एल्विश यादव याच्या चांगलेच अंगलट आल्याचे बघायला मिळतंय.