Ranbir Kapoor सोबत रिलेशनशिपमध्ये होती कतरिना कैफ; इमरान हाश्मीचा ‘तो’ सल्ला ठरला ब्रेकअपचं कारण !

इमरान हाश्मी याच्यामुळे रणबीर कपूर - कतरीना कैफ यांचं झालं ब्रेकअप? इमरान याने अभिनेत्रीला दिलेला 'तो' सल्ला कोणता होता?

Ranbir Kapoor सोबत रिलेशनशिपमध्ये होती कतरिना कैफ; इमरान हाश्मीचा 'तो' सल्ला ठरला ब्रेकअपचं कारण !
Follow us
| Updated on: Jun 16, 2023 | 11:50 AM

मुंबई | अभिनेत्री कतरीना कैफ अभिनेता आणि पती विकी कौशल याच्यासोबत वैवाहिक आयुष्याचा आनंद घेणार आहे. तर दुसरी कडे अभिनेता रणबीर कपूर देखील अभिनेत्री आलिया भट्ट हिच्यासोबत आयुष्यात पुढे गेला आहे. कतरीना – विकी आणि रणबीर – आलिया यांच्या नात्याच्या चर्चा सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये कायम रंगलेल्या असतात. पण एक काळ असा होता जेव्हा कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला होता. दोघांनी काही सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन देखील शेअर केली. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांच्या प्रेमाचा वाईट अंत झाला. कतरिना आणि रणबीर यांच्या ब्रेकअपच्या चर्चा देखील तुफान रंगल्या.. दरम्यान, बॉलिवूडचा सीरियल किसर म्हणून ओळख असलेल्या इमरान हाश्मी (Emraan Hashmi) याने कतरिनाला एक सल्ला दिला होता. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती.

दिग्दर्शक करण जोहर याचा शो ‘कॉफी विथ करण’मध्ये इमरान याने हजेरी लावली होती. शोमध्ये रॅपिड फायर फेरीत करण याने इमरान याला रणबीर आणि कतरिना यांना सल्ला देण्यासाठी सांगितलं.. करणने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना अभिनेत्याने कतरिनाला एक सल्ला दिला होता..

रणबीर याला सल्ला देतना इमरान म्हणाला, ‘आता लेडीज मॅनवाला खेळ बंद कर.. चाहत्यांची तुझ्याकडून जास्त अपेक्षा आहे…’ तर पुढे इमरानने कतरिना हिला रणबीर याला सोडण्याचा सल्ला दिला. ज्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं होतं. सांगायचं झालं तर अनेक अभिनेत्रींसोबत रणबीर याचं नाव जोडण्यात आलं.

हे सुद्धा वाचा

अभिनेत्री दीपिका पादुकोण हिला डेट केल्यानंतर काही वर्षांमध्ये दोघांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर रणबीरच्या आयुष्यात अभिनेत्री कतरिना कैफ हिची एन्ट्री झाली. दोघांच्या नात्याची चर्चा देखील तुफान रंगली. चाहत्यांनी देखील दोघांच्या नात्याला डोक्यावर घेतलं. पण ‘जग्गा जासूस’ सिनेमानंतर रणबीर आणि कतरिना यांचं ब्रेकअप झालं..

आता रणबीर, दीपिका आणि कतरिना तिघं त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत. आलिया आणि रणबीर यांनी १४ एप्रिल २०२२ मध्ये आलिया आणि रणबीर यांनी लग्न केलं. ठराविक पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघांचा विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आलियाने सोनोग्राफीचा फोटो शेअर करत चाहत्यांना आई होणार असल्याची माहिती दिली.

राहाच्या जन्मानंतर आलिया आणि रणबीर कायम त्यांच्या लेकीबद्दल बोलताना दिसतात. पण अद्याप दोघांनी लेकीचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. रणबीर आणि आलिया यांनी लेकीसाठी ‘नो फोटो पॉलिसी’ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.