AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Movie List 2021 | नवीन वर्षात मनोरंजनाची मेजवानी, ‘हे’ बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

अनलॉक अंतर्गत थिएटर सुरू झाल्याने 2021मध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. 2021 या नवीन वर्षात मनोरंजनाची मोठी मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.

Movie List 2021 | नवीन वर्षात मनोरंजनाची मेजवानी, ‘हे’ बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार!
| Updated on: Dec 26, 2020 | 12:11 PM
Share

मुंबई : 2020 हे वर्ष मनोरंजन विश्वासाठी अतिशय खडतर ठरले आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे इतर सगळ्या गोष्टींप्रमाणेच चित्रपटगृहेदेखील लॉकडाऊन झाली होती. ज्यामुळे चित्रपटाच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमुळे बर्‍याच चित्रपटांचे चित्रीकरण खंडित झाले होते. परंतु, आता 2021 या नव्या वर्षाची सगळेच आशेने वाट बघत आहेत. हे नवे वर्ष सर्वांसाठी आनंद आणू शकते. अनलॉक अंतर्गत थिएटर सुरू झाल्याने 2021मध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. 2021 या नवीन वर्षात मनोरंजनाची मोठी मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. नव्या वर्षात बॉलिवूडचे अनेक बहुचर्चित आणि बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत (Entertainment bash Big Budget films releasing in new year 2021).

83

कपिल देव यांच्या आयुष्यावर आधारित बहुचर्चित चित्रपट ‘83’ हा 2020मध्ये प्रदर्शनाच्या मार्गावर होता. परंतु, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. आता हा चित्रपट 2021मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून 1983च्या विश्वचषक सामन्याच्या आठवणी पुन्हा ताज्या होणार आहेत. या चित्रपटात रणवीर सोबत दीपिका पदुकोण, पंकज त्रिपाठी आणि अनेक कलाकार दिसणार आहेत.

राधे

सलमान खानचा ‘राधे : युअर मोस्ट वांटेड भाई’ हा चित्रपट 2020मध्ये ईदच्या निमित्ताने प्रदर्शित होणार होता. पण लॉकडाऊनमुळे चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होऊ शकले नाही. चर्चित वृत्तानुसार आता हा चित्रपट 2021च्या ईदला प्रदर्शित हणार आहे. या चित्रपटात सलमानसह दिशा पाटनी, जॅकी श्रॉफ महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवांनी केले आहे.

बधाई दो

अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. हे दोघेही ‘बधाई हो’ चित्रपटाची फ्रेंचायझी ‘बधाई दो’मध्ये दिसणार आहेत. ‘बधाई दो’ हा एक विनोदी चित्रपट असून, यातून एक खास कथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे (Entertainment bash Big Budget films releasing in new year 2021).

लालसिंग चड्ढा

आमिर खान आणि करिना कपूर यांचा बहुचर्चित चित्रपट ‘लालसिंग चड्ढा’ची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत आहे. हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक असणार आहे. ‘लालसिंग चड्ढा’ हा चित्रपट डिसेंबर 2021मध्ये प्रदर्शित होईल. करिना कपूरने नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे.

बॉबी बिस्वास

अभिषेक बच्चन सध्या त्याच्या आगामी ‘बॉबी बिस्वास’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. सुजॉय घोष यांच्या ‘कहानी’ या चित्रपटातील एका पात्रावर या चित्रपटाची कथा आधारित आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन हटके लूकमध्ये दिसणार आहे.

बच्चन पांडे

बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार दरवर्षी 4 ते 5 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणतो. त्याच्या याच प्रथेनुसार 2021मध्येही अक्षय अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. त्यापैकी एक म्हणजे ‘बच्चन पांडे’. ‘बच्चन पांडे’मध्ये अभिनेत्री कृती सेनॉन अक्षयसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

आरआरआर

‘बाहुबली’च्या अभूतपूर्व यशानंतर एस. एस. राजामौली ‘आरआरआर’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटात दोन स्वातंत्र्यसैनिकांची कथा दाखवली जाणार आहे. यात जुनिअर एनटीआर, राम चरण, आलिया भट्ट, अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

(Entertainment bash Big Budget films releasing in new year 2021)

हेही वाचा :

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.