Esha Deol Divorce : ईशा देओलचं मोठं वक्तव्य, ‘लग्नानंतर झाले मोठं बदल, घरात शॉर्ट्स घालणं म्हणजे…’

Esha Deol Divorce : 'लग्नानंतर आयुष्यात झाले मोठे बदल...' ईशा देओल म्हणाली, 'भरत तख्तानी याच्यासोबत लग्न केल्यानंतर घरात देखील मला...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा देओल हिच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Esha Deol Divorce : ईशा देओलचं मोठं वक्तव्य, 'लग्नानंतर झाले मोठं बदल, घरात शॉर्ट्स घालणं म्हणजे...'
Follow us
| Updated on: Feb 09, 2024 | 8:28 AM

मुंबई | 9 फेब्रुवारी 2024 : अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेते धर्मेंद्र यांची लेक ईशा देओल हिच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उद्योजक भरत तख्तानी याच्यासोबत लग्न केलं होतं. पण अभिनेत्रीचा संसार फक्त 12 वर्ष टिकला. ईशा देओल आणि भरत तख्तानी यांनी काही दिवसांपूर्वी घटस्फोट झाल्याचं घोषित केलं. घटस्फोटानंतर ईशा हिच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. 2020 मध्ये ‘अम्मा मिया’ नावाच्या प्रदर्शित झालेल्या पुस्तकात ईशा देओल हिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.

पुस्तकात ईशा लिहिलं होतं, ‘2012 मध्ये लग्न झाल्यानंतर माझ्या आयुष्यातील अनेक गोष्टी बदलल्या. लग्नानंतर मी अधिक समजदार आणि जबाबदार झाली होती. मला माझ्या आयुष्यातील अनेक गोष्टी बदलाव्या लागल्या. जेव्हा मी भरत याच्यासोबत त्याच्या कुटुंबासोबत राहण्याची सुरुवात केली, तेव्हा घरात शॉर्ट्स घालून फिरण्याची मला परवानगी नव्हती…’

‘लग्नाआधी मी पूर्ण घरात शॉर्ट्स घालून फिरायची. पण भरत याचं कुटुंब समजून घेणार आहे. माझ्या सासूबाई मला कायम म्हणतात, ती माझ्या तिसऱ्या मुलासारखी आहेस. पण मी त्यांच्या घरातील पहिली सून होती. म्हणून माझ्यावर सर्वांनी प्रचंड प्रेम केलं. प्रत्येक जण माझ्यासाठी काही न काही घेवून यायचे…’ असं देखील ईशा म्हणाली होती.

हे सुद्धा वाचा

ईशा – भरत यांचं संपलं नातं…

अभिनेत्री एक स्टेटमेंट जारी करत घटस्फोट झाल्याची घोषणा केली. अभिनेत्री म्हणाली, ‘आम्ही दोघांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे…हा निर्णय आमच्या मुलींसाठी फार महत्त्वाचा होता.’ गेल्या काही दिवसांपूर्वी ईशा – भरत विभक्त झाल्याची माहिती मिळत आहे. ईशा हिच्या घटस्फोटानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

ईशा देओल – भरत तख्तानी यांनी 29 जून 2012 को इस्कॉन मंदिरात लग्न केलं. लग्नाच्या 5 वर्षांनंतर ईशा देओल हिने मुलीला जन्म दिला. त्यानंतर 2019 मध्ये ईशा हिने दुसऱ्या मुलीला जन्म दिला. ईशा आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम  सक्रिय असते. सोशल मीडियावर ईशा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री दोन मुलींसोबत देखील फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.