Paurashpur | रिलीज होण्याच्या अगोदरच ‘पौरषपूर’ वेब सीरीज बोल्ड सिनमुळे चर्चेत!

पौरषपूर’ या वेब सीरीजचा ट्रेलर लाँच झाला आहे. ही वेब सीरीज ऑल्ट बालाजी आणि जी5 वर रिलीज होणार आहे.

Paurashpur | रिलीज होण्याच्या अगोदरच ‘पौरषपूर’ वेब सीरीज बोल्ड सिनमुळे चर्चेत!
Follow us
| Updated on: Dec 08, 2020 | 7:37 PM

मुंबई : ‘पौरषपूर’ या वेब सीरीजचा ट्रेलर लाँच झाला आहे. ही वेब सीरीज ऑल्ट बालाजी आणि जी5 वर रिलीज होणार आहे. यात मिलिंद सोमण, अन्नू कपूर, शिल्पा शिंदे, शाहीर शेख, पौलमी दास, साहिल सलाथिया आणि फ्लोरा सैनी एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ही सीरीज 29 डिसेंबरला रिलीज होणार आहे. मात्र, ही वेब सीरीज रिलीज होण्याच्या अगोदरच दाखवण्यात आलेल्या बोल्ड सिनमुळे चर्चेत आली आहे.(Even before its release, ‘Paurashpur’ web series is in the news due to its bold scenes!)

ट्रेलरमध्ये असे दिसत आहे की, पौरषपूरचा राजा अन्नू कपूर आणि त्यांची पत्नी शिल्पा शिंदे यांच्यातील नात्यात तणाव दिसत आहे. राजाला बऱ्याच राण्या आहेत. राजा आपल्या कोणत्याच राणीला राज्याबाहेर जाऊ देत नाही असे दाखवण्यात आले आहे. त्यानंतर राणी मीरावती राज्यातून गायब होऊन शत्रू मिलिंद सोमण याच्याशी हातमिळवणी करून सूड घेते.

पौरषपूर ही वेबसीरीज पुरुषी मक्तेदारीविरोधात, महिलांना मिळणारी असमान वागणूक यावर आधारित आहे. भव्यदिव्य सेट, सत्तेसाठी होणारी लढाई, वासना, रक्ताने लाल झालेल्या तलावारी, प्रभावशाली संवाद, पुरुष आणि महिलांमधील असमानता असे अनेक पैलू या सीरीजमधून उलगडणार असल्याचे दिसत आहे. पौरषपूर या वेब सीरीजचे कथानक पुरुषप्रधान संस्कृतीवर आधारित आहे. मिलिंद सोमण योद्धाच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहीर शेखचीही ट्रेलरमध्ये चांगली एन्ट्री आहे. या सीरीजमध्ये बरीच बोल्ड सीन दाखवली गेली आहेत, जे पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. शिल्पा शिंदेने पौरशपूर माध्यमातून डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवले आहे. या सीरिजचे 7-8 भाग असणार आहेत. शिल्पा शिंदे पौरशपूर विषची म्हणते की, पौरशपूर सारख्या वेब सीरीजमध्ये काम करत असताना भारी वाटत आहे. आशा आहे की, शूटच्या वेळी आम्ही जितका आनंद घेतला तितका तुम्हीपण पाहताना घ्याल.

संबंधित बातम्या :

Dhwani Bhanushali | ध्वनि भानुशालीच्या ‘नयन’ गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ!

Kareena Kapoor | करीना कपूरच्या पोस्टरवर चाहते म्हणाले…सून असावी तर अशी!

(Even before its release, ‘Paurashpur’ web series is in the news due to its bold scenes!)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.