Ambani wedding : अंबानींकडून 2 कोटींच गिफ्ट, बदल्यात पाहुण्यांनी अनंत अंबानींना गिफ्टमध्ये काय दिलं असेल?
Ambani wedding : आज अंबानींकडे काय नाहीय? त्यांना हवी ती प्रत्येक गोष्ट ते विकत घेऊ शकतात. अनेकांना तरी एक प्रश्न पडलाय, अनंत अंबानींच्या लग्नात पाहुण्यांनी त्यांना काय गिफ्ट दिलं असेल? त्याच उत्तर असं असू शकतं.
मुंबईत सध्या एक डोळे दिपवून टाकणारा विवाह सोहळा सुरु आहे. सगळीकडे देश-विदेशात या लग्नाची चर्चा आहे. चर्चा का असू नये? या विवाह सोहळ्यात काय नाहीय? ग्लॅमर, शाही थाट सगळच या लग्नामध्ये दिसतय. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानींचा वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स येथील जियो वर्ल्ड सेंटरमध्ये विवाह सोहळा सुरु आहे. 12 जुलैल अनंत अंबानी राधिक मर्चेंट बरोबर विवाहबद्ध झाले. सलग चार दिवस जियो वर्ल्ड सेंटरमध्ये लग्नाचा रिसेप्शन सोहळा सुरु होता. तसं बघायला गेलं, तर मागच्या पाच महिन्यांपासून हा लग्न सोहळा सुरु आहे. जामनगर येथे प्री-वेडिंग सेलिब्रेशनने या लग्न सोहळ्याला सुरुवात झाली. लग्नाच्या दिवशी फक्त भारतातीलच नव्हे जगभरातील नामवंत व्यक्ती उद्योजक, हॉलिवूड स्टार्स या लग्नाला हजर होते.
अनंत अंबानींच्या लग्नाच वैशिष्ट्य म्हणजे एकाबाजूला डोळे दिपवून टाकणारा भव्य सोहळा दिसला. त्याचवेळी दुसऱ्याबाजूला भक्तीरस, अध्यात्म, अन्नदान सुद्धा दिसलं. अंबानी कुटुंबाच्या या लग्न सोहळ्याला अध्यात्माची जोड होती. अनंत अंबानी यांनी स्वत: मुंबईत अँटिलिया येथे 40 दिवस भंडारा आयोजित केला होता. दिवसाला जवळपास 9 हजार लोक इथे भोजन करायचे. त्यामुळे एकाबाजूला शाही थाट त्याचवेळी दुसऱ्या बाजूला सामाजिक भान, कर्तव्य दिसलं.
लग्नात पाहुण्यांनी त्यांना काय गिफ्ट दिलं असेल?
अनंत अंबानींच्या लग्ना रिर्टन गिफ्ट सुद्धा चर्चेचा विषय ठरलं. अनंत अंबानी यांनी आपल्या जवळच्या मित्रांना जवळपास 2 कोटी रुपयांच एक खास घड्याळ भेट दिलं. त्याचवेळी या लग्नासाठी निमंत्रित करण्यात आलेल्या प्रत्येक पाहुण्यांसाठी सुद्धा खास गिफ्ट होतं. आज अंबानींकडे काय नाहीय? त्यांना हवी ती प्रत्येक गोष्ट ते विकत घेऊ शकतात, येणाऱ्या पाहुण्यांकडून त्यांना फक्त एकच अपेक्षा असेल, ती म्हणजे आशिर्वाद. अनेकांना तरी एक प्रश्न पडलाय, अनंत अंबानींच्या लग्नात पाहुण्यांनी त्यांना काय गिफ्ट दिलं असेल? त्याच उत्तर असं असू शकतं.
जॅकी श्रॉफ यांनी काय गिफ्ट दिलं?
अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमाला येणारे पाहुणे बऱ्याचदा धार्मिक देवी, देवतांच्या मुर्ती, पेटिंग्स गिफ्टमध्ये देतात. हिंदुस्थान टाइम्सने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलय. अंबानी कुटुंबासाठी नेहमीच अध्यात्म, पूजा अर्चा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर भगवान विष्णू, माता लक्ष्मीचे फोटो होते. त्यामुळे लग्नात पाहुण्यांनी अशाच पद्धतीच गिफ्ट दिल्याची शक्यता आहे. जॅकी श्रॉफ यांच्याकडून झाडाच रोपटं गिफ्टमध्ये देण्यात आलं.