AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rupali Bhosale | ‘बिग बॉस’मधील टशन ते टीव्हीवरची व्हिलन, बघा संजना रिअल लाईफमध्ये ‘कुठे काय करते!’

बिग बॉसच्या घरात असताना रुपालीने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील दुखरी नस उलगडून दाखवली होती. मात्र जुनं विसरुन नव्या आयुष्याची ओढ असल्याची सकारात्मकता तिच्या डोळ्यात दिसते (Marathi TV Actress Rupali Bhosale)

Rupali Bhosale | 'बिग बॉस'मधील टशन ते टीव्हीवरची व्हिलन, बघा संजना रिअल लाईफमध्ये 'कुठे काय करते!'
अभिनेत्री रुपाली भोसले
| Updated on: Mar 31, 2021 | 4:59 PM
Share

मुंबई : ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या सिझनमध्ये चर्चेत आलेली अभिनेत्री रुपाली भोसले सध्या ‘आई कुठे काय करते!’ मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे. अनिरुद्ध आणि अरुंधती यांच्या संसारात बिब्बा घालणाऱ्या संजनाची व्यक्तिरेखा ती खुबीने निभावत आहेत. गेल्या वर्षीच रुपालीने आपल्या रिलेशनशीपची जाहीर वाच्यता केली. रुपाली आणि तिचा बॉयफ्रेण्ड अंकित मगरे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. (Everything to know about Aai Kuthe Kay Karte Marathi Bigg Boss Fame Marathi TV Actress Rupali Bhosale)

मराठी-हिंदी मालिका गाजवल्या

‘या गोजिरवाण्या घरात’ मालिकेतून रुपालीने मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर मन उधाण वाऱ्याचे, दोन किनारे दोघी आपण, दिल्या घरी तू सुखी रहा, स्वप्नांच्या पलिकडले, कुलस्वामिनी, कुलवधू, कन्यादान, वहिनीसाहेब यासारख्या असंख्य मालिकांमध्ये तिने लहान-मोठ्या भूमिका साकारल्या. कस्मे वादे, बडी दूर से आये है, तेनालीराम यासारख्या हिंदी मालिकांमध्येही ती झळकली. अगदी ‘रिस्क’ सिनेमातील छोटेखानी भूमिकेतून तिने बॉलिवूडची दारंही ठोठावली आहेत.

‘बिग बॉस मराठी’मुळे ओळख

रुपाली भोसलेला मोठी ओळख मिळाली ती ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या सिझनमध्ये. सुरुवातीला शिव-वीणा-किशोरी यांच्या गटात असलेल्या रुपालीची काही वादानंतर ताटातूट झाली. त्यानंतर परागसोबत तिची वाढती जवळीक गॉसिपचा विषय ठरत होती.

रुपाली बिग बॉसच्या घरात आपल्या गेमबाबतही तितकीच फोकस्ड होती. महेश मांजरेकर यांनी कान टोचल्यानंतर रुपाली अधिक स्ट्राँग झाल्याचं चाहत्यांनी पाहिलं. मात्र अंतिम फेरीपासून काही पावलं दूर असतानाच तिचं अनपेक्षित एलिमिनेशन झालं. बिग बॉसच्या घरात असताना रुपालीने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील दुखरी नस उलगडून दाखवली होती. मात्र जुनं विसरुन नव्या आयुष्याची ओढ असल्याची सकारात्मकता तिच्या डोळ्यात दिसते. तसंच, सख्खा भाऊ संकेतविषयीचं तिचं प्रेमही वारंवार दिसून आलंय.

‘आई कुठे काय करते!’त संजनाची भूमिका लोकप्रिय

दरम्यान, ‘आई कुठे काय करते!’ मालिकेतील संजनाची भूमिकाही रुपालीकडे अनपेक्षितपणे चालून आली. अभिनेत्री दीपाली पानसरे आधी संजनाची भूमिका साकारत होती. मात्र लॉकडाऊनच्या काळात मालिकेला ब्रेक लागला. त्यानंतर संजना बदलली. दीपालीऐवजी रुपालीची वर्णी लागली. अनिरुद्धवरील प्रेम, नव्या संसाराची ओढ, अरुंधतीची इर्षा अशी संजना दीक्षितच्या भूमिकेतील ग्रे शेड रुपालीने नेमकी पकडली आहे. त्यामुळेच संजनाचा राग येतानाच तिची हतबलताही प्रेक्षकांना जाणवते.

अंकित मगरेसोबत रिलेशनशीपमध्ये

गेल्या वर्षी रुपालीने अंकित मगरेसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची अधिकृत घोषणा केली होती. अंकित हा निर्माता-दिग्दर्शक आहे. त्याची स्वतःची पीआर आणि डिजिटल मार्केटिंग फर्म आहे. रुपाली आणि अंकित यांचे लव्ही-डव्ही फोटो आणि इन्स्टाग्राम स्टोरीज चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतात. दोघं आपल्या नात्याला लवकरच नवीन कोंदण देणार आहेत. रुपालीने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये मंगळसूत्राचा फोटो शेअर करत ‘तयारी सुरु झाली आहे’ असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे रुपाली बोहल्यावर कधी चढणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. (Marathi TV Actress Rupali Bhosale)

संबंधित बातम्या :

वीणाची एक्झिट, ‘या’ अभिनेत्रीची ‘आर्या’ म्हणून एंट्री! सोशल मीडियावर शेअर केला खास लूक

‘होणार सून मी..’ आधी तब्बल तीन मालिका, बॉलिवूड डेब्यूमध्येच किसिंग सीन, लाडकी सून तेजश्री प्रधानचा प्रवास

(Everything to know about Aai Kuthe Kay Karte Marathi Bigg Boss Fame Marathi TV Actress Rupali Bhosale)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.