मुंबई पोलिसांसाठी सेगवेचे अक्षय कुमारच्या उपस्थिती लॉन्चिंग, मात्र चर्चा अक्षयच्या खास ट्राऊझरची!
यानंतर चर्चा रंगली ती म्हणजे बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारने घातलेल्या ट्राउजरची, कारण या कार्यक्रमात अक्षय कुमारने काळ्या रंगाची ट्राउजर घातली होती
मुंबई : भाजप नेते आशिष शेलार यांच्या विधानसभा मतदार संघातील कार्टर रोड येथे पोलीसांना गस्तीसाठी आवश्यक असलेले सेल्फ बॅलेसिंग इलेक्ट्रिक स्कूटर म्हणजेच सेगवेचे (Segway System) लोकार्पण महाराष्ट्र पोलिस दलाच्या स्थापना दिनाच्या दिवशी करण्यात आले होते. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, गृहमंत्री अनिलजी देशमुख, अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आदी उपस्थित होते.(Everywhere talk of trousers worn by Akshay Kumar)
मात्र, यानंतर चर्चा रंगली ती म्हणजे बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारने घातलेल्या ट्राउजरची, कारण या कार्यक्रमात अक्षय कुमारने काळ्या रंगाची ट्राऊझर घातली होती, त्याखाली पांढऱ्या रंगाचे बुट देखील होते. त्या ट्राऊझरची एक बाजू अर्धी उघडी होती. यामुळे त्यावरून आता सोशल मिडियावर विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. काही जणांचे म्हणणे आहे की, ही अक्षयची नवीन स्टाईल आहे तर बरेच जण विविध अंदाज काढत आहेत.
At the inaugural of @MumbaiPolice’s self balancing vehicles of Freego to patrol our promenade at Worli and Carter Road. Happy to see the modernization of our police force, on par with global standards. HM @AnilDeshmukhNCP ji @AUThackeray @CPMumbaiPolice pic.twitter.com/TXX52aEXOT
— Akshay Kumar (@akshaykumar) January 2, 2021
अक्षय कुमार हिंदी चित्रपटसृष्टीचा सर्वात महाग सुपरस्टार बनला आहे. आता तो त्याच्या एका चित्रपटासाठी 135 कोटी शुल्क घेणार आहे. बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार, अक्षयने 2022 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांसाठी फी वाढविली आहे. 2020 च्या सुरूवातीस त्याने 102 कोटी शुल्क घेण्याची घोषणा केली होती. नंतर त्याने ते वाढवून 123 कोटी केले. कोरोनापूर्वी त्यांचा सूर्यवंशी हा चित्रपट रिलीज होण्यास तयार होता पण लॉकडाऊनमुळे तो चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.
‘राम सेतू’चे चित्रीकरण
अक्षय कुमारला त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण उत्तर प्रदेशात करायचे होते. याकरीता परवानगी मागण्यासाठी आणि सहकार्य करण्याची विनंती करण्यासाठी अक्षय कुमारने योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. दोघांमध्ये ‘राम सेतू’ चित्रपटाविषयी चर्चा झाली. तर, योगी आदित्यनाथ यांनी अक्षयला अयोध्येत चित्रीकरणाचे आमंत्रण दिले होते.
या भेटी दरम्यान त्यांनी अक्षय कुमारची खूप प्रशंसा केल्याचे देखील म्हटले जात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, अक्षय कुमारने आपल्या ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटातून समाज प्रबोधन केले. तसेच, अक्षयचे चित्रपट नेहमीच समाजाला प्रेरणा देणारे ठरत असल्याचे म्हणत योगी आदित्यनाथ यांनी अक्षय कुमारचे कौतुक केले होते.
संबंधित बातम्या :
Shocking : ड्रग्ज केसमध्ये सारा अली खानचं नाव, हातातून गेला दूसरा मोठा चित्रपट!
लब्बाड कियारा, सिद्धार्थ मल्होत्रासोबत ट्रीपला आणि कॅप्शनमध्ये म्हणते एकटीच?
(Everywhere talk of trousers worn by Akshay Kumar)