Nitin Desai | भाजपाच्या ‘या’ नेत्याने नितीन देसाई यांना दिलेला फ्रेश स्टार्टचा सल्ला, डोक्यावर होतं 252 कोटींच कर्ज
Nitin Desai | नितीन देसाई यांना भाजपाच्या कुठल्या नेत्याने सल्ला दिलेला? 2016 आणि 2018 असं दोनवेळा नितीन देसाई यांनी ECL फायनान्स कंपनीकडून किती कर्ज घेतलं होतं?
मुंबई : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई बुधवारी मृतावस्थेत आढळले. त्यांनी आपलं जीवन संपवलं. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात कर्जत येथील एन.डी.स्टुडिओमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नितीन देसाई यांनी आत्महत्या का केली? त्या मागची कारणं आता समोर येत आहेत. नितीन देसाई यांच्या डोक्यावर 252 कोटींच कर्ज असल्याच बोललं जातय. मागच्या आठवड्यात कोर्टाने त्यांच्या कंपनी विरोधात दिवाळखोरीची याचिका दाखल करुन घेतली होती.
देसाई यांच्या ND आर्ट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ECL फायनान्स कंपनीकडून 2016 आणि 2018 असं दोन वेळा 185 कोटी रुपयांच कर्ज घेतलं होतं. जानेवारी 2020 पासून कर्जाची परतफेड करताना कंपनीला अडचणी येत होत्या.
भाजपा नेत्याने नितीन देसाई यांना काय सांगितलेलं?
भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे हे नितीन देसाई यांचे जवळचे मित्र होते. “मी त्याच्यासोबत बोलायचो. त्याला समजावायचो. अमिताभ बच्चन कसं कर्ज फेडून आयुष्यात पुन्हा उभे राहिले, याचं मी त्याला उदहारण द्यायचो. कर्जामुळे स्टुडिओ जप्त झाला, तरी तू नवीन सुरुवात करु शकतोस हे मी त्याला सांगायचो. त्याच्या मृत्यूबद्दल ऐकून खूप वाईट वाटलं. एक दिवस आधीच मी त्याच्याशी बोललो होतो” असं विनोद तावडे हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना म्हणाले.
ND आर्ट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड काय काम करायची?
नितीन देसाई यांची ND आर्ट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चित्रपटाच्या शूटिंगसाठी ऐतिहासिक राजवाडे, स्मारक यांची प्रतिकृती उभी करायची. हॉटेल, थीम रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल याच्या सुविधा सुद्धा एनडी कंपनीकडून दिल्या जायच्या. 30 जून 2022 रोजी एकूण कर्जाचा भार किती होता?
25 जुलैला राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाच्या मुंबई खंडपीठाने एडलवाईस कंपनीची ND आर्ट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड विरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरु करण्याबद्दलची याचिका दाखल करुन घेतली होती. तारण ठेवलेल्या गोष्टी विकून कर्जदारांना त्यांचे पैसे मिळवून देण्याची जबाबदारी ही दिवाळखोरीशी संबंधित प्रोफेशन्लसशी असते. 30 जून 2022 रोजी नितीन देसाई यांच्यावरील कर्जाचा भार 252.48 कोटी रुपये झाला होता.