गौतमी भोवती हा वेढा कुणाचा? गौतमीशी का होऊ दिला जात नाही सेलिब्रिटींचा संपर्क

गौतमी पाटील हिने आहिराणी गाण्यात काम करण्याची इच्छा असल्याचं 'टीव्ही ९ मराठी'शी बोलताना सांगितलं. पण खानदेशातील दिग्गज कलाकार आणि निर्मात्यांनी गौतमीशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. पण गौतमीच्या बाजूने हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही, अशी माहिती आता समोर येत आहे.

गौतमी भोवती हा वेढा कुणाचा? गौतमीशी का होऊ दिला जात नाही सेलिब्रिटींचा संपर्क
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 10:22 PM

मुंबई : नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्याशी सेलिब्रिटींना संपर्क होणे अगदी अवघड झाले आहे. मध्यंतरी गौतमी पाटील हिला अनेक चित्रपटांच्या तसेच गाण्याच्या अल्बमसाठी ऑफर होत्या. पण तिच्यापर्यंत निरोप पोहचत नसल्याचा आरोप काही निर्माते आणि कलाकार मंडळी यांनी केला आहे. गौतमी ही कमी वयात आणि कमी काळात लोकप्रिय झालेली व्यक्ती असल्याने तिला देखील मॅनेजमेंट फारसे अवगत नसल्याचं दिसून येत आहे. संपर्काची जबाबदारी तिने ज्यांच्यावर सोपवली आहे, त्यांनी तिला प्रत्येक निरोप पोहोचवणे गरजेचे आहे. यात सेलिब्रिटी तसेच प्रमुख मीडिया क्षेत्रातील मंडळीचा संपर्क होत नसल्याने अनेकांनी तिच्या जनसंपर्क तसेच स्वीय सहाय्यकांविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

गौतमी हिच्याशी सेलिब्रिटीजचा संपर्क होत नसल्याने काही सेलिब्रिटींनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. गौतमीला सेलिब्रिटीजचे निरोप दिले जात नसतील तर गौतमी पाटील हिच्या आजूबाजूला वेढा कुणाचा आहे? हा देखील प्रश्न आहे. आहिराणी गाण्यातील संगीतकार आणि खानदेशचे सुपरस्टार सचिन कुमावत यांच्या टीमनेदेखील गौतमी हिला गाण्याच्या ऑफरसाठी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना देखील कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

गौतमीसोबत संपर्क होऊ शकत नाही?

गौतमीचा डान्स हे कुणासाठी सतत पैसे कमवण्याचे मशीन तर झालेले नाही ना? कारण खानदेशातील एका संस्थेने त्यांचा पुण्यात गौरव करण्याचं ठरवलं आहे, त्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे, या कार्यक्रमात खानदेशातील नामांकीत कलाकार मंडळी हजर राहणार आहेत, पण या कार्यक्रमासाठी शेवटपर्यंत गौतमी पाटील हिच्याशी संपर्क होवू शकत नाहीय, असं चित्र दिसतंय.

हे सुद्धा वाचा

सचिन कुमावत यांच्या टीमकडून नाराजी व्यक्त

गौतमी पाटील हिने आहिराणी गाण्यात काम करण्याची इच्छा असल्याचं ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सांगितलं. पण आपण यापूर्वीच गौतमी पाटील हिला आहिराणी गाण्यात कामाची ऑफर दिली होती, पण ही ऑफरच तिच्यापर्यंत पोहोचली नसल्याची खंत सचिन कुमावत यांच्या टीमकडून व्यक्त करण्यात आली आहे. गौतमी पाटील हिने आहिराणी गाण्यात काम केल्यास तो एक नवीन अविष्कार नक्कीच असेल, याला प्रचंड मोठ्या प्रमाणात यश येईल हे नक्की आहे. पण आपण सतत शुटिंग आणि कामाच्या प्लॅनिंगमध्ये बिझी असतो, त्यात गौतमी पाटील हिच्याशी संपर्क करणे कठीण झाल्याने, आपण हा विचार सोडून दिला होता, पण गौतमी पाटील यांच्याकडून प्रतिसाद मिळाल्यास गाण्यावर नक्कीच बोलणी करु, असं खान्देशातील एका नामांकीत निर्मात्याने म्हटलं आहे.

सचिन कुमावत यांचे सोशल मीडियावर मोठे चाहते आहेत. त्यांच्या जोडीला गौतमी पाटील आली आणि गाण्याच्या करार हक्काबाबत, योग्य करार झाला, तर ही जोडी महाराष्ट्रात हिट होवू शकते असं बोललं जात आहे. पण आता सर्व काही गौतमीपर्यंत कसं पोहोचतं आणि ती कशी तयार होते, हे देखील महत्त्वाचे आहे.

अहिराणी भाषा वाचावी, अहिराणी भाषिकांचं आपल्या बोलीभाषेतून मनोरंजन व्हावं यासाठी अनेक दिग्गज कलाकार विविध माध्यमांतून काम करत आहेत. यामध्ये सचिन कुमावत, निर्माते गोकुळ पाटील अशी मोठी नावं आहेत. पण या दिग्गजांनी किंवा त्यांच्या टीमकडून गौतमी पाटील हिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर तिच्या बाजूने प्रतिसाद शून्य मिळाला. तिच्या आजूबाजूची माणसं तिच्यापर्यंत पोहोचूच देत नाहीत, असं या दिग्गजांच्या निदर्शनास आलंय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.