Sanchari Vijay Road Accident | अपघातात गंभीर दुखापत, उपचारादरम्यान राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचे निधन

राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित झालेला कन्नड अभिनेता संचारी विजय (Sanchari Vijay) याचे निधन झाले आहे. अभिनेत्याच्या मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी (11 जून) विजयचा बेंगळुरूमध्ये अपघात झाला होता.

Sanchari Vijay Road Accident | अपघातात गंभीर दुखापत, उपचारादरम्यान राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचे निधन
संचारी विजय
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 2:34 PM

मुंबई : राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित झालेला कन्नड अभिनेता संचारी विजय (Sanchari Vijay) याचे निधन झाले आहे. अभिनेत्याच्या मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी (11 जून) विजयचा बेंगळुरूमध्ये अपघात झाला होता. यात गंभीर जखमी झालेल्या विजयला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान अभिनेता संचारी विजय याचे आज (14 जून) निधन झाले आहे (Famous Kannad actor Sanchari Vijay dies in Road Accident).

अपघातानंतर अभिनेत्यावर एक ऑपरेशन झाले होते, तरीही हा 38 वर्षीय अभिनेता ही लढाई जिंकू शकला नाही. बातमीनुसार विजय हा दुचाकीवरून आपल्या मित्राच्या घरून परत येत असताना हा अपघात घडला होता.

बॉलिवूड अभिनेता किच्चा सुदीप याने ट्विटद्वारे चाहत्यांना ही दु:खद बातमी दिली होती. सुदीप यांनी ट्विट करुन लिहिले आहे की, ‘संचारी विजयने शेवटचा श्वास घेतला, या लॉकडाऊनमध्ये दोनदा त्यांची भेट घेतली होती…तो पुढील चित्रपटाबद्दल खूप उत्सुक होता, जे झाले ते अतिशय खेदजनक आहे. त्याचे कुटुंब आणि मित्रपरिवाराला सावरण्यास शक्ती मिळो…’

पाहा पोस्ट :

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, शुक्रवारी रात्री विजयचा अपघात झाला होता. अपघातामुळे अभिनेत्याच्या मेंदूत उजव्या बाजूला खूप रक्तस्राव झाला होता. ज्यामुळे त्याची प्रकृती खूप गंभीर झाली होती.

राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

2011मध्ये ‘रंगप्पा होगाबिटना’ या चित्रपटाद्वारे विजयने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते आणि त्यानंतर ‘हरिवू’ आणि ‘ओगाराने’ सारख्या हिट चित्रपटांत त्याने काम केले होते. 2015 च्या ‘नानू अवानल्ला अवालु’ या चित्रपटातून संचारी विजयला त्याची खरी ओळख मिळाली. या चित्रपटासाठी अभिनेत्याला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले होते. तो अखेर ‘1978’ या चित्रपटात झळकला होता.

कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये विजयने लोकांना खूप मदत केली होती. विजय अशा एका संस्थेशी संबंधित होता, जी कोरोनाने संक्रमित लोकांना ऑक्सिजन प्रदान करत होती. अशाप्रकारे अभिनेत्याच्या अचानक निघून जाण्याने आता सर्वजण दु:खी झाले आहेत.

(Famous Kannad actor Sanchari Vijay dies in Road Accident)

हेही वाचा :

Happy Birthday Jubin Nautiyal | ज्या गाण्याच्या कार्यक्रमात झाला रिजेक्ट, त्याच कार्यक्रमात परीक्षक म्हणून लावली हजेरी, वाचा गायक जुबिन नौटियालचा संघर्ष

Sushant Singh Rajput Death Anniversary | ‘फिर मिलेंगे चलते चलते…’, अंकिता लोखंडेने शेअर केलेला व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यातही येईल पाणी!

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.