Bappi Lahiri Corona | सुप्रसिद्ध गायक-संगीतकार बप्पी लहरींना कोरोनाची लागण, मुंबईतील रुग्णालयात दाखल
बप्पी लहरी यांची कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. ते सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात तज्ञांच्या देखरेखीखाली आहेत.
मुंबई : भारतात कोरोना विषाणूच्या विळख्यात येणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. पुन्हा एकदा कोरोनाने तीव्र रुप धारण केले आहे. प्रत्येकाला कोरोनाच्या दुसर्या लाटेचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही आठवड्यांत कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. यावेळी कोरोनाने बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर शिरकाव केला आहे. बॉलिवूडचे कलाकार एकामागून एक कोरोनाच्या विळख्यात अडकत आहे. आता जेष्ठ गायक-संगीतकार बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांचेही नाव या यादीमध्ये सामील झाले आहे (Famous Musician Bappi Lahiri tested Corona positive).
अभिनेता कार्तिक आर्यन, आमीर खान, परेश रावल, आर माधवन, रणबीर कपूर हे सेलिब्रेटी अलीकडेच कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. आता संगीत दिग्दर्शक बप्पी लहरी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. बप्पी लहरी यांच्या वतीने त्यांच्या प्रवक्त्यांनी एक निवेदन शेअर केले आहे.
बप्पी लहरी यांना कोरोनाची लागण
एका प्रसिद्ध वेबसाईटच्या वृत्तानुसार, बप्पी लहरी यांच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘शक्य ती सगळी खबरदारी घेतल्यानंतरही बप्पी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.’
त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. केली. ‘सावधानता बाळगूनही, दुर्दैवाने बप्पी लहरी यांची कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. ते सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात तज्ञांच्या देखरेखीखाली आहेत’, असे या निवेदनात म्हटले आहे (Famous Musician Bappi Lahiri tested Corona positive).
अलीकडच्या काळात त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना बाप्पीदादांच्या कुटुंबियांनी विनंती केली आहे की, त्यांनी खबरदारी म्हणून स्वतःची देखील तपासणी करावी. यासह निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, ‘त्यांना त्यांचे चाहते, मित्र आणि भारत व विदेशातील सर्व लोकांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा हव्या आहेत.’
बप्पी लहरी यांची ओळख
संगीतकार बप्पी लहरी यांचे खरे नाव आलोक लहरी असे असून, त्यांचा जन्म 1952मध्ये पश्चिम बंगाल स्थित जलपाईगुडीमध्ये झाला होता. 1972मध्ये ‘दादू’ या बंगाली चित्रपटातून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली होती. त्यानंतर 1973साली त्यांनी ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटामध्ये काम केले. यानंतर, ताहिर हुसेन यांच्या 1976मध्ये आलेल्या ‘जखमी’ या चित्रपटाद्वारे बप्पी लहरी यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
(Famous Musician Bappi Lahiri tested Corona positive)
हेही वाचा :
‘पुष्पा आय हेट टीयर’ म्हणत राजेश खन्नांनी गाजवला मोठा पडदा, वाचा ‘या’ डायलॉगची मनोरंजक कथा!
Rajinikanth | ‘थलायवा’ रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, मंत्री प्रकाश जावडेकर यांची मोठी घोषणा@rajinikanth | #Rajinikanth | #DadasahebPhalkeAward | #Entertainment https://t.co/2VJLHfKp2z
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 1, 2021