Daler Mehndi arrested: प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी याला अटक

मानवी तस्करी( Human trafficking) प्रकरणी दलेर मेहंदी याला अटक करण्यात आली आहे. कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. हे प्ररकरण 15 वर्ष जुने आहे.

Daler Mehndi arrested: प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी याला अटक
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 8:31 PM

दिल्ली : प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी याला( Famous Punjabi singer Daler Mehndi ) अटक(arrest) झाली आहे. मानवी तस्करी( Human trafficking) प्रकरणी दलेर मेहंदी याला अटक करण्यात आली आहे. कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. हे प्ररकरण 15 वर्ष जुने आहे. या मानवी तस्करी प्रकरणी पंधरा वर्षांपूर्वी दलेर मेहंदी याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. पंधरा वर्षांपूर्वीच्या या प्रकरणावर आज सुनावणी झाली. पटियाला कोर्टाने(Patiala Court) या प्रकरणी दलेर मेहंदीला दोषी ठरवले आहे. या प्रकरणी कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर कोर्टाने त्याला अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

मानवी तस्करीच्या आरोप प्रकरणी 2003 मध्ये दलेर मेहंदीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल 18 वर्ष हे प्रकरण कोर्टात सुरु होते. 2018 मध्ये, पटयालाच्या न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सुमारे 15 वर्षांच्या सुनावणीनंतर त्याला दोन वर्षांचा कारावास आणि 2,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. 3 वर्षांपेक्षा कमी शिक्षा झाल्यामुळे दिलर मेहंदीला त्याचवेळी जामीन मिळाला. या प्रकरणातील आणखी एक आरोपी बुलबुल मेहताची निर्दोष मुक्तता करण्यात आली. तर शमशेर सिंग आणि ध्यानसिंग या आणखी दोन आरोपींचा मृत्यू झाला आहे.

सत्र न्यायालयात याचिका फेटाळली

दिलेर मेहंदी याने ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला पटियाला सत्र न्यायालयात आव्हान दिले. गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान अतिरिक्त सत्र न्यायाधीश एचएस ग्रेवाल यांनी दिलेरची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर दिलर याला कोर्टातच अटक करण्यात आली.

दलेर महेंदी अशी करायचा मानवी तस्करी

पंजाबी गायक दिलेर मेहंदी हा त्याच्या विविध कार्यक्रमांसाठी परदेशात जायचा. शोसाठी जात असताना 1998-99 मध्ये बेकायदेशीरपणे 10 लोकांना अमेरिकेत नेल्याचा आरोप त्याच्यावर आहे. हे दहा जण त्याचा शो च्या टीमचा भाग असल्याचे त्याने सांगीतले होते. त्यांना परदेशात नेण्याच्या बदल्यात त्याने पैसे घेतले होतो. यानंतर 19 सप्टेंबर 2003 रोजी दिलेरचा भाऊ शमशेर याच्याविरुद्ध मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीअंती पोलिसांनी दिलेरचेही नाव यात उघड केले.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.