नवे गाणे प्रदर्शित होण्यापूर्वीच काळाचा घाला, प्रसिद्ध गायकाचा रस्ते अपघातात मृत्यू

प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजान (Singer Diljaan) याचे एका अपघातात निधन झाले. मंगळवारी पहाटे 3.45 वाजताच्या सुमारास हा अपघात (Road Accident) झाला.

नवे गाणे प्रदर्शित होण्यापूर्वीच काळाचा घाला, प्रसिद्ध गायकाचा रस्ते अपघातात मृत्यू
दिलजान
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 10:34 AM

मुंबई : प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजान (Singer Diljaan) याचे एका अपघातात निधन झाले. मंगळवारी पहाटे 3.45 वाजताच्या सुमारास हा अपघात (Road Accident) झाला. रात्री उशिरा दिलजान आपल्या गाडीने अमृतसरहून करतारपूरकडे येत होता आणि याच दरम्यान जंडियाला गुरु येथे हा अपघात घडला. या अपघात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. दिलजान हा करतारपूरचा रहिवासी होता. त्यांच्या अकस्मात मृत्यूमुळे त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. दिलजानच्या कारने दुभाजकाला धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे (Famous Punjabi singer Diljaan Died in road accident).

मिळालेल्या माहितीनुसार, दिलजान रात्री उशिरा आपल्या कारमधून अमृतसरहून करतारपूरकडे जात होता, त्याच वेळी जंडियाला गुरु येथे त्याचा अपघात झाला आणि त्यातच दिलजान याचा मृत्यू झाला. हा अपघात कशामुळे झाला याचा तपास केला जात आहे.

कसा घडला अपघात?

अमृतसर-जालंधर जीटी रोडवरील जंडियाला गुरु पुलाजवळ पंजाबी गायक दिलजानची कार दुभाजकाला आदळली. मंगळवारी पहाटे 3:45 वाजता हा अपघात झाला. घटनास्थळी दिलजान याचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून दिलजानचा मृतदेह ताब्यात घेतला. त्याचा मृतदेह पोस्टमार्टसाठी रवाना करण्यात आला आहे (Famous Punjabi singer Diljaan Died in road accident).

जंडियाला गुरु पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक यादवंद्र सिंह यांनी सांगितले की, या अपघाताचा तपास केला जात असण, त्यामागचे कारण शोधून काढले जात आहे. मंगळवारी पहाटे दिलजान आपल्या कारमधून अमृतसरहून करतारपूरच्या दिशेने जात होता. जीटी रोडवर त्याच्या कारचा वेग अतिशय जोरात होता. पुलाजवळ पोहोचताच त्याची कार अनियंत्रित झाली आणि दुभाजकाला धडक दिल्याने ती पलटी झाली. हा अपघात पाहून तेथून जाणाऱ्या लोकांनी त्याचा जीव वाचवण्यासाठी मदतकार्य सुरू केले. मात्र, रुग्णालयात नेण्याआधीच दिलजानचा मृत्यू झाला होता.

चाहत्यांवर शोककळा

नवे गाणे लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार होते!

दिलजनाचे वडील मदन मदार यांनी सांगितले की, दिलजानाचे नवीन गाणे 2 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. सोमवारी तो या संदर्भातील बैठकीस उपस्थित राहण्यासाठी आपल्या महिंद्र केयूडी या कारमधून अमृतसरला गेला होता. रात्री उशिरा परतत असताना हा अपघात झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी दिलजान गाडीत एकटा होता.

अशा परिस्थितीत दिलजान याच्या निधनामुळे चाहते खूप दुःखी झाले आहेत. सोशल मीडियावर चाहते त्याच्या आठवणी शेअर करत गायकाला वेगवेगळ्या प्रकारे श्रद्धांजली देत आहेत. आपल्या छोट्याशा कारकीर्दीत दिलजानने बरीच उत्तम गाणी गायली होती.

(Famous Punjabi singer Diljaan Died in road accident)

हेही वाचा :

Saleel Kulkarni Corona | सर्वतोपरी काळजी घेऊनही टेस्ट पॉझिटिव्ह, गायक सलील कुलकर्णी कोरोनाबाधित

‘मी घरी आलोय पण आता ती रुग्णालयात दाखल’, सतीश कौशिकना सतावतेय लेकीची चिंता!

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.