AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Samantha | डेट करण्याचा सल्ला देणाऱ्या चाहतीला समंथाचं मजेशीर उत्तर; नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक

समंथाच्या या उत्तराने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. समंथाने ऑक्टोबर 2021 मध्ये नाग चैतन्यला घटस्फोट दिला. तेव्हापासून ती सिंगलच आहे. 'कॉफी विथ करण'मध्येही तिने स्पष्ट केलं होतं की आता तिला सिंगलच राहायचं आहे.

Samantha | डेट करण्याचा सल्ला देणाऱ्या चाहतीला समंथाचं मजेशीर उत्तर; नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक
SamanthaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 27, 2023 | 1:28 PM

हैदराबाद : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेली समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या आगामी ‘शाकुंतलम’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. ती हैदराबादपासून ते मुंबईपर्यंत या चित्रपटाची प्रसिद्धी करतेय. सोशल मीडियावरही समंथाचे चाहते तिला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. अशातच रविवारी एका चाहतीने ट्विटरवर समंथाला एक खासगी विनंती केली. तू एखाद्याला डेट कर, असं संबंधित चाहतीने ट्विटरवर लिहिलं. त्यावर समंथाने दिलेलं उत्तर सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे.

रविवारी एका ट्विटर हँडलने समंथाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आणि त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘मला माहितीये की मी हे बोलण्याची माझी लायकी नाही. पण तरी समंथा कृपया तू कोणाला तरी डेट कर.’ या ट्विटसोबत चाहतीने हृदयाचा आणि काळजी करतानाचा इमोजी पोस्ट केला. त्यावर समंथाने उत्तर दिलं आहे. समंथाने तिच्या उत्तरात लिहिलं, ‘माझ्यावर तुमच्यासारखं प्रेम कोण करेल?’

हे सुद्धा वाचा

समंथाच्या या उत्तराने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. समंथाने ऑक्टोबर 2021 मध्ये नाग चैतन्यला घटस्फोट दिला. तेव्हापासून ती सिंगलच आहे. ‘कॉफी विथ करण’मध्येही तिने स्पष्ट केलं होतं की आता तिला सिंगलच राहायचं आहे आणि अशाच पद्धतीने जीवनाचा आनंद घ्यायचा आहे.

समंथाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख बनवलीच आहे. मात्र आता त्याचसोबत ती हिंदी प्रेक्षकांमध्येही लोकप्रिय झाली आहे. ‘द फॅमिली मॅन 2’ या वेब सीरिजमधील दमदार भूमिका साकारून आणि ‘पुष्पा 2’मधील ‘ऊ अंटावा’ या आयटम साँगमधून तिने हिंदी प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. समंथाचा ‘शाकुंतलम’ हा चित्रपट येत्या 14 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

गेल्या काही काळापासून समंथा मायोसिटीस या आजाराचा सामना करतेय. मायोसिटिस ही आरोग्याची अशी एक स्थिती आहे ज्यामध्ये स्नायूंमध्ये तीव्र वेदना होतात. मायो म्हणजे स्नायू आणि आयटीस म्हणजे जळजळ (वेदना). याला व्हायरल इन्फेक्शन, विशिष्ट औषधं आणि स्वयं रोगप्रतिकार शक्ती अशी विविध कारणं कारणीभूत असू शकतात.

शाकुंतलमच्या प्रमोशनदरम्यान आजारपणामुळे समंथाच्या चेहऱ्यावरील तेज हरपलंय, अशी कमेंट एका चाहत्याने तिच्या या फोटोंवर केली होती. त्यावर समंथानेही सडेतोड उत्तर दिलं होतं. ‘मी प्रार्थना करते की तुम्हाला माझ्यासारखं अनेक महिने उपचार आणि औषधांचा त्रास सहन करावं लागू नये.. आणि तुमचं तेज वाढवण्यासाठी माझ्याकडून तुम्हाला प्रेम,’ अशा शब्दांत तिने ट्रोलरला फटकारलं होतं.

पाकला कडकी...भीक मागण्याची वेळ तरी युद्धाची खुमखुमी, जगापुढे पसरले हात
पाकला कडकी...भीक मागण्याची वेळ तरी युद्धाची खुमखुमी, जगापुढे पसरले हात.
पाकिस्तानची मोठी कबुली...ती आमची चूक, US च्या इशाऱ्यावरून घाणरडं कृत्य
पाकिस्तानची मोठी कबुली...ती आमची चूक, US च्या इशाऱ्यावरून घाणरडं कृत्य.
जल, थल, आकाश! भारताकडून पाकिस्तानवर जोरदार हल्ला सुरूच
जल, थल, आकाश! भारताकडून पाकिस्तानवर जोरदार हल्ला सुरूच.
पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं! भारतानंतर बलुच आर्मीचा पाकवर हल्ला
पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं! भारतानंतर बलुच आर्मीचा पाकवर हल्ला.
चोराच्या उलटा बोंबा, पाकचा माज उतरेना, म्हणताय एकही अतिरेकी अड्डा नाही
चोराच्या उलटा बोंबा, पाकचा माज उतरेना, म्हणताय एकही अतिरेकी अड्डा नाही.
पाकिस्तानचा अटारी सीमेवर हल्ल्याचा प्रयत्न फसला
पाकिस्तानचा अटारी सीमेवर हल्ल्याचा प्रयत्न फसला.
पाकने जगातील देशांपुढे पसरले हात केली एकच विनंती, भारताला सांगा...
पाकने जगातील देशांपुढे पसरले हात केली एकच विनंती, भारताला सांगा....
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेला हादरे
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेला हादरे.
S-400 भारताने घातले पाकिस्तानचे दात पुन्हा घशात, पाकड्यांचा डाव उधळला
S-400 भारताने घातले पाकिस्तानचे दात पुन्हा घशात, पाकड्यांचा डाव उधळला.
सीमावर्ती भागात घरांचं नुकसान; भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर
सीमावर्ती भागात घरांचं नुकसान; भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर.