जबलपूरहून सायकल चालवत पोहोचला ‘भाईजान’च्या भेटीला; सलमान खानने केलं असं स्वागत!

सलमानच्या भेटीसाठी कडाक्याच्या थंडीत 5 दिवस चालवली सायकल; जबरा फॅनच्या प्रेमापुढे 'दबंग' खानही नमला!

जबलपूरहून सायकल चालवत पोहोचला 'भाईजान'च्या भेटीला; सलमान खानने केलं असं स्वागत!
जबलपूरहून सायकल चालवत पोहोचला 'भाईजान'च्या भेटीला; सलमान खानने केलं असं स्वागत! Image Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jan 02, 2023 | 1:26 PM

मुंबई: बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमानने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. सलमानची एक झलक पाहण्यासाठी वाढदिवशी चाहत्यांनी त्याच्या घराबाहेर तुंबड गर्दी केली होती. ही गर्दी इतकी वाढली की नंतर पोलिसांना त्यावर लाठीचार्ज करावा लागला. सलमानला भेटण्यासाठी देशभरातून चाहते त्याच्या घराबाहेर जमा झाले होते. प्रत्येक चाहत्याला सलमानची भेट घेणं शक्य होत नाही. मात्र काही असे चाहते असतात, जे त्यांच्या कामामुळे सलमानचं लक्ष वेधून घेतात. अशाच एका चाहत्याने सलमानचं लक्ष वेधून घेतलं आहे.

देशभरातील विविध राज्यांमध्ये सध्या कडाक्याची थंडी आहे. अशा थंडीत सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक चाहता जबलपूर इथून आला. या चाहत्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो जबलपूरहून सायकल चालवत मुंबईला आला. त्याच्या सायकलवर ‘बीईंग ह्युमन’ हे सलमानच्या संस्थेचं नाव लिहिलं आहे. या सायकलवर त्याने एक पोस्टरसुद्धा लावला आहे. ‘चलो उनको दुआएं देते चलें’ असं त्यावर लिहिलं आहे.

हे सुद्धा वाचा

जबलपूरहून सायकल चालवत आलेल्या या चाहत्याची खास भेट सलमानने घेतली. त्याच्यासोबत फोटोसुद्धा क्लिक केले. या चाहत्याला जबलपूरहून मुंबईला सायकलवर यायला पाच दिवस लागले. निघताना त्याच्या मित्रांनी गोड दही खायला देऊन त्याला निरोप दिला होता.

सलमानचा वाढदिवस हा त्याच्या चाहत्यांसाठी एक मोठा इव्हेंट असतो. त्याच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील ‘गॅलेक्सी’ या बंगल्याबाहेर चाहत्यांची तुफान गर्दी होते. यंदा ही गर्दी इतकी वाढली होती की पोलिसांनी अखेर हस्तक्षेप करत त्यावर लाठीचार्ज केला.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.