Shah Rukh Khan | ‘सुहानाने हृतिकसोबत रोमान्स केला तर?’, चाहत्याचा किंग खान याला थेट प्रश्न

Shah Rukh Khan | शाहरुख खान लेक सुहाना हिला अभिनेता हृतिक रोशन याच्यासोबत रोमान्स करू देईल? चाहत्यांनी किंग खान याला का विचारला असा प्रश्न?, सध्या सर्वत्र शाहरुख खान याच्या वक्तव्याची चर्चा

Shah Rukh Khan | 'सुहानाने हृतिकसोबत रोमान्स केला तर?', चाहत्याचा किंग खान याला थेट प्रश्न
Follow us
| Updated on: Sep 11, 2023 | 10:53 AM

मुंबई : 11 सप्टेंबर 2023 | अभिनेता शाहरुख खान याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. किंग खान याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. शाहरुख खान याला फॉलो करणाऱ्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, सातासमुद्र पार देखील आहे. अनेक सिनेमांमध्ये काम करत अभिनेत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. रोमान्सचा बादशाह म्हणून देखील अभिनेत्याची ओळख आहे. दरम्यान अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शाहरुख खान याला स्वतःच्या अर्ध्या वयाच्या अभिनेत्रीसोबत काम करत असल्यामुळे चाहत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

शाहरुख खानचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर काही युजर्सनी किंग खान याला फटकारलं आहे. युजर्सनी किंग खानची मुलगी सुहाना खान हिला देखील या वादामध्ये ओढलं. उद्या सुहाना खान हिनेने हृतिक रोशन किंवा शाहिद कपूरसोबत रोमान्स केला तर तुला कसं वाटेल? सध्या सर्वत्र किंग खान याची चर्चा रंगत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर अभिनेता म्हणाला, ‘मी एक असा अभिनेता आहे, जो प्रत्येक अभिनेत्रीसोबत काम करतो. मी काय करु… आलिया किंवा इतर अभिनेत्रींकडू जावून त्यांना नकार देवू… मी निर्माते, दिग्दर्शक यांना जावून बोलू शकत नाही की माझ्या वयाच्या अभिनेत्रीसोबत मी काम करेल… माफ करा पण मी असं नाही करुच शकत…मी कौशल्य पाहतो, वय नाही… ‘ असं देखील अभिनेता म्हणाला.

हे सुद्धा वाचा

किंग खान कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. सोशल मीडियावर देखील त्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील किंग खान त्याच्या अनोख्या अंदाजात चाहत्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देत असतो. अभिनेता त्याच्या कुटुंबाबद्दल देखील अनेक गोष्टी चाहत्यांना सांगत असतो.

अभिनेता शाहरुख खान सध्या ‘जवान’ सिनेमामुळे चर्चेत आहे. ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या सिनेमाने चार दिवसांत तगडी कमाई केली आहे. किंग खान याला पाहण्यासाठी चाहते चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘जवान’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. सिनेमात किंग खान याच्यासोबत अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि नयमतारा महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. आता येत्या दिवसात सिनेमा किती कोटी रुपयांची कमाई करेल हे पाहणं पहत्त्वाचं  ठरणार आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.