अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू असतानाच मलायका अरोरा हिने घातला चक्क असा शर्ट, चाहत्यांना बसला मोठा धक्का
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे त्यांच्या रिलेशनमुळे नेहमीच चर्चेत असतात. चाहते गेल्या काही वर्षांपासून यांच्या लग्नाची वाट देखील बघत आहेत. मात्र, आता यांच्या ब्रेकअपची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचे ब्रेकअप झाल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई : अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा (Malaika Arora) हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासून मलायका ही अर्जुन कपूर याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. विशेष म्हणजे सुरूवातीला हे दोघेही आपल्या नात्याबद्दल लपवताना दिसत होते. मात्र, आता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा हे पार्टी आणि अनेक शोमध्ये एकसोबत हजेरी लावतात. इतकेच नाही तर नेहमीच मुंबईमध्ये स्पाॅट होतात. काही दिवसांपूर्वीच अर्जुन कपूर याचा खास फोटो मलायका हिने सोशल मीडियावर शेअर केला होता.
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे काही दिवसांपूर्वी विदेशात धमाल करताना दिसले होते. अर्जुन कपूर याने मलायका अरोरा हिचे काही खास फोटो शेअर केले होते. अनेकांना अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांची जोडी प्रचंड आवडते. इतकेच नाही तर चाहते यांच्या लग्नाची वाट पाहताना देखील दिसत आहेत.
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचे ब्रेकअप झाल्याची बातमी गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. मात्र, यावर अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनी काहीच भाष्य केले नाहीये. सुट्टयांमध्ये धमाल करताना एकटाच अर्जुन कपूर हा दिसला. यावेळीचे काही स्पेशल फोटो हे अर्जुन कपूर याने इंस्टाग्रामवर शेअर देखील केले.
View this post on Instagram
नुकताच मलायका अरोरा ही मुंबईमध्ये स्पाॅट झालीये. मात्र, यावेळी मलायका अरोरा हिने घातलेल्या टी- शर्टवरून अनेक चर्चांना उधाण आले आहे. मलायका अरोरा हिने घातलेल्या शर्टवर लिहिण्यात आले होते की, ‘Lets fall apart’ चला वेगळे होऊया. आता मलायका अरोरा हिचा हा व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का हा बसला आहे.
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे त्यांच्या नात्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांवर नेहमीच रिप्लाय करताना दिसतात. मात्र, हे पहिल्यांदाच होत आहे की, त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा इतक्या जास्त सुरू आहेत, मात्र यांनी त्यावर अजून काहीच भाष्य केले नाहीये. इतकेच नाही तर अर्जुन कपूर याचे नाव एका अभिनेत्रीसोबत जोडले देखील जात आहे.
मलायका अरोरा ही देखील अर्जुन कपूर याला सोडून पार्टी करताना दिसली आहे. यामुळे अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचे ब्रेकअप झाल्याचे सांगितले जात आहे. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे सोशल मीडियावरही एकमेकांचे फोटो कायमच शेअर करताना दिसतात. मात्र, ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान एकही फोटो एकमेकांचा यांनी शेअर केला नाहीये.