Aamir Khan | अगोदर गंभीर आरोप, प्रकरण कोर्टात आणि आता थेट गळाभेट, आमिर खानच्या ‘त्या’ फोटोमुळे मोठी खळबळ
बाॅलिवूड अभिनेता आमिर खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. आमिर खान हा चित्रपटांपासून दूर आहे. आमिर खान याने जाहिर केले होते की, बरीच वर्षे सतत चित्रपट करत असल्यामुळे कुटुंबियांना अजिबातच वेळ देऊ शकलो नाही. यामुळे पुढील काही वर्षे त्यांना वेळ देणार आहे.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता आमिर खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. आमिर खान (Aamir Khan) याचा लाल सिंह चढ्डा हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. आमिर खान याच्या लाल सिंह चढ्डा या चित्रपटाकडून प्रचंड अशा अपेक्षा होत्या. मात्र, चित्रपट फ्लाॅप गेला. या चित्रपटात (Bollywood) आमिर खान याच्यासोबत करीना कपूर खान ही देखील मुख्य भूमिकेत होती. आमिर खान आणि संपूर्ण चित्रपटाची टीम या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसली होती. या चित्रपटावर 20 वर्षांपासून काम करत असल्याचे देखील आमिर खान याने म्हटले होते. लाल सिंह चढ्डा चित्रपट (Movie) फ्लाॅप गेल्याने आमिर खान या खूप जास्त निराश झाला.
इतकेच नाही तर लाल सिंह चढ्डा चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर आमिर खान याने अत्यंत मोठी घोषणा करत थेट म्हटले होते की, आता काही वर्षे मी अभिनयापासून थोडा दूर जातोय. सतत चित्रपटात काम करत असल्याने गेल्या काही वर्षांपासून मी कुटुंबियांना अजिबातच वेळ देऊ शकत नाहीये. आता मला माझ्या कुटुंबियांना वेळ द्यायचा आहे.
नुकताच आमिर खान याने आईचा 89 वा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला आहे. या वाढदिवसाचे काही खास फोटो हे आमिर खान याची एक्स पत्नी किरण हिने शेअर केले. आता नुकताच आमिर खान याची बहीण निखत हिनेही काही फोटो हे शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आमिर खान हा फॅमिलीसोबत चांगला वेळ घालवताना दिसत आहे. निखत हिने शेअर केलेल्या फोटोंपैकी एक फोटो पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. या फोटोमध्ये आमिर खान हा त्याचा भाऊ फैसल याची गळाभेट घेताना दिसत आहे.
काही वर्षांपूर्वीच फैसल याने आमिर खान याच्यावर अत्यंत गंभीर आरोप हे केले होते. फैसल याने म्हटले होते की, मी कुटुंबावर नाराज असल्याने त्यांच्यापासून दूर गेलो होता. माझे कुटुंबिय ही गोष्ट समजू शकले नाही आणि त्यांनी मला पागल घोषित केले. माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी आमिर साहिबांनी थेट बॉर्डीगाड्स ठेवले होते. जेंव्हा मी कुटुंबियांच्या विरोधात गेलो, त्यावेळी मी घर सोडले.
त्यानंतर मी माझ्या पोलिस असलेल्या मित्राकडे गेलो. त्याने सांगितले की, तुला पागल घोषित करण्यासाठी तुझ्या घरच्यांनी खासगीमध्ये तुझी तपासणी केली. मग मी सरकारी हाॅस्पीटलमध्ये गेलो आणि तपासणी केली ही केस बरीच वर्षे सुरू होती आणि मी जिंकलो.आमिर आणि त्याच्या भावामध्ये मोठा वाद बघायला मिळाला आणि आता ते एकत्र येत वाढदिवस साजरा करताना दिसल्याने सर्वांना मोठा धक्का बसला.