‘तरुण वर्ग तुमच्याच नादात असला आणि…’, शेतकरी मुलाचं गौतमी पाटील हिला पत्र

'गौतमी पाटीलचे हाल बेहाल.....', शेतकरी मुलगा गौतमी पाटील हिला पत्र लिहित म्हणतो, 'तुझ्यासोबत लग्न करायला कोणीच...' सध्या सर्वत्र प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचीच चर्चा

'तरुण वर्ग तुमच्याच नादात असला आणि...', शेतकरी मुलाचं गौतमी पाटील हिला पत्र
Follow us
| Updated on: Apr 17, 2023 | 11:58 AM

मुंबई : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) कायम सर्वत्र चर्चेत असते. गौतमीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नृत्याची आवड जपत गौतमीने सर्वांच्या मनावर राज्य केलं आहे. गौतमी हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. संपूर्ण महाराष्ट्रात गौतमीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. एवढंच नाही तर, मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रिटी म्हणून देखील गौतमीने स्वतःची ओळख तयार केली आहे. काही दिवसांपूर्वी गौतमी भावी जोडीदाराबद्दल भाष्य केलं होतं. कसा जोडीदार हवा याबद्दल गौतमी सांगितलं होतं. हाच मुद्दा लक्षात घेत एका शेतकरी मुलाने गौतमी हिला पत्र लिहिलं आहे.

गौतमीला पत्र लिहिणाऱ्या शेतकरी मुलाचं नाव किसानपुत्र श्रीकांत गडाले असं आहे. तो बीड याठिकाणी राहतो. श्रीकांत याने फेसबूकवर पत्र पोस्ट केलं आहे. सध्या त्याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शिवाय अनेकांनी शेतकरी मुलगा श्रीकांत याने लिहिलेल्या पत्रावर प्रतिक्रिया दिली आहे. पत्र लिहित श्रीकांत म्हणाला ‘तुझ्यासोबत लग्न करायला कोणीच तयार नाही’… एवढंच नाही तर, पोस्ट शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये ‘गौतमी पाटीलचे हाल बेहाल…..’ असं लिहिलं आहे.

हे सुद्धा वाचा

भावी जोडीदाराबद्दल काय म्हणाली गौतमी पाटील? काही दिवसांपूर्वी गौतमीने जोडीदाराबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. आयुष्यात पती कसा हवा याबद्दल गौतमीने मोठं वक्तव्य केलं होतं. जोडीदाराबद्दल गौतमी म्हणाली, ‘मला प्रसिद्धी, प्रतिष्ठा, बंगला, पैसा… काहीही नकोय. माझ्या आयुष्यात जी परिस्थिती येईल, त्या परिस्थितीत माझी साथ देणारा जोडीदार मला हवा आहे…’ असं गौतमी म्हणाली.

गौतमीचं अभिनय क्षेत्रात पदार्पण नृत्याच्या जोरावर गौतमी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. गौतमीचा पहिला मराठी सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. गौतमीच्या पहिल्या सिनेमाचं नाव ‘घुंगरु’ असं आहे. सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला असून चाहते सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. (Gautami Patil Dance)

गौतमी पाटील सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. तिचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गौतमीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमलेली असते. आता गौतमी मोठ्या पडद्यावर देखील झळकणार आहे.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.