प्रसिद्ध मॉडेलचं निधन; वयाच्या २७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
एका प्रसिद्ध मॉडेलने वयाच्या २७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतल्यानंतर सर्वांना मोठा धक्का बसला आहे. मॉडेलच्या निधनाची बातमी मित्राने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.
मुंबई : फॅशनविश्वातून एक अत्यंत वाईट बातमी समोर येत आहे. एका प्रसिद्ध मॉडेलने वयाच्या २७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतल्यानंतर सर्वांना मोठा धक्का बसला आहे. २७ व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या मॉडेलचं नाव जेरेमी रुहेलमन असं आहे. जेरेमी रुहेलमन जगभरातील प्रसिद्ध मॉडेल आहे. मॉडेलच्या निधनानंतर फॅशन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. जेरेमी रुहेलमन याच्या निधनाची माहिती त्याच्या मित्राने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. जेरेमीचा मित्र आणि डिझायनर ख्रिश्चन सिरियानो याने इन्स्टाग्रावर फोटो पोस्ट करत मॉडेलच्या निधनाची माहिती दिली आहे.
ख्रिश्चन सिरियानो पोस्टमध्ये म्हणाला, ‘मी याआधी कहीही अशी पोस्ट शेअर केलेली नाही. पण आयुष्यातील सर्वात खास मित्राला गमावणं प्रचंड कठीण आहे.’ सध्या ख्रिश्चन सिरियानो याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
ख्रिश्चन सिरियानो पुढे भावना व्यक्त करत म्हणाला, ‘हे फक्त जेरेमी साठी… ज्याने प्रत्येकाला प्रेम दिलं. मला माहित आहे आपण पुन्हा भेटू. पण आता तुला मला मिठी मारायची आहे. आम्ही प्रत्येक जण तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो…’ असं म्हणत ख्रिश्चन सिरियानो याने मित्र जेरेमी रुहेलमन याच्या निधनानंतर भावना व्यक्त केल्या आहेत.
जेरेमी रुहेलमन कायम सोशल मीडियावर सक्रिय असायचा. जेरेमी रुहेलमन जगातील प्रसिद्ध मॉडेल होता. निधनाच्या आधी २० जानेवारी जेरेमी याने फोटोशूट केलं होतं. जे त्याने सोशल मीडियावर पोस्ट केलं. जेरेमी रुहेलमनने पेरी एलिस आणि सुपरड्री यांच्यासाठी मॉडेलिंग केलं होतं. सोशल मीडियाच्या माध्यामातून अनेक चाहते जेरेमी याला श्रद्धांजली वाहत आहेत.