लग्नास नकार दिल्याचा राग, मुंबईत चित्रपट अभिनेत्रीवर चाकूहल्ला

अभिनेत्री मालवी मल्होत्राने लग्नाची मागणी धुडकावल्याच्या रागातून आरोपी योगेशकुमारने तिच्यावर चाकू हल्ला केल्याचा आरोप आहे.

लग्नास नकार दिल्याचा राग, मुंबईत चित्रपट अभिनेत्रीवर चाकूहल्ला
Follow us
| Updated on: Oct 27, 2020 | 12:39 PM

मुंबई : लग्नास नकार दिल्याने मुंबईत चित्रपट अभिनेत्री मालवी मल्होत्रा हिच्यावर चाकूहल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मालवीवर कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Film Actress Malvi Malhotra attacked for rejecting marriage proposal)

29 वर्षीय मालवीने अनेक हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत. मालवीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या योगेशकुमार महिपाल सिंग या आरोपीने तिला लग्नाची मागणी घातली होती. मात्र मालवीने ती धुडकावल्याच्या रागातून त्याने तिच्यावर चाकू हल्ला केल्याचा आरोप आहे.

हल्लेखोर आरोपीने फेसबुकवरुन मालवीशी संपर्क साधला होता. याआधी तीन-चार वेळा तो मालवीला भेटला होता. आपण निर्माता असल्याचे सांगून त्याने मालवीची भेट घेतली होती. त्यानंतर त्याने लग्नासाठी तिला प्रपोज केले होते. तो मालवीवर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता. मात्र तिचा ठाम नकार होता. ती दुर्लक्ष करत असल्याने योगेश तिचा पाठलाग करत असे.

मालवीच्या नकारामुळे संतापलेला आरोपी तिच्यावर पाळत ठेवून होता. दोनच दिवसांपूर्वी मालवी दुबईहून परतली असता तिच्या बिल्डिंगखाली उभा होता. काल रात्री अंधेरीतील वर्सोवा भागात तो ऑडीने आला आणि तिच्यावर चाकूने हल्ला केला. मालवीच्या पोटात, मनगटावर आणि बोटावर अशा तीन ठिकाणी वार केल्याची माहिती आहे.

हेही वाचा : रणवीर सिंहच्या एक्स गर्लफ्रेण्डसोबत डेटिंग, आदित्य रॉय कपूर म्हणतो…

जखमी मालवीवर अंधेरीतील कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती सुदैवाने धोक्याबाहेर आहे. मुंबईतील वर्सोवा पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(Film Actress Malvi Malhotra attacked for rejecting marriage proposal)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.