कोरोनामुळे गर्भवती महिला पत्रकाराचा मृत्यू, धक्क्याने वडीलही कोमात, बॉलिवूडकरांनी दिला मदतीचा हात!

आरती आणि तिच्या कुटुंबाला या धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांनी मोलाचे सहकार्य केले. मनोज मेहरा यांनी  आरतीच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी सगळ्यांना आवाहन केले होते.

कोरोनामुळे गर्भवती महिला पत्रकाराचा मृत्यू, धक्क्याने वडीलही कोमात, बॉलिवूडकरांनी दिला मदतीचा हात!
आरती पाटोळे
Follow us
| Updated on: Apr 10, 2021 | 1:20 PM

मुंबई : कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जगभरात कोरोनाचा कहर सुरु असताना देशातही या विषाणूने पुन्हा एकदा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. दररोज हजारो लोक या विषाणूला बळी पडत आहे. या विषाणूमुळे अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमावले आहेत. याच काळात एका हरहुन्नरी महिला पत्रकाराचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला. ही महिला पत्रकार गर्भवती होती. याच दरम्यान तिला कोरोनाची लागण झाली होती (Film journalist Aarti Patole died due to corona infection).

आरती पाटोळे असे या महिला पत्रकाराचे नाव आहे. त्या मनोरंजन क्षेत्रात सक्रिय होत्या. त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून त्याच्या वडिलांना देखील मोठा धक्का बसला आहे. या धक्क्याने त्यांचे वडील कोमात गेले. त्यांना देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याची माहिती सिनेपत्रकार आणि छायाचित्रकार विरल भयानी यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

पाहा पोस्ट

 (Film journalist Aarti Patole died due to corona infection)

काय म्हटलंय या पोस्टमध्ये?

‘नुकतीच आम्ही एक अतिशय उत्साही आणि मेहनती चित्रपट पत्रकार आरतीला गमावले. सर्वकाही चांगले सुरु होते. गर्भावस्थेदरम्यान कोव्हिडने तिच्या कुटुंबावर परिणाम करेपर्यंत सर्व काही सुरळीत चालू होते. मात्र, या नाजून अवस्थेत ती या व्हायरसशी लढा देऊ शकली नाही आणि आम्हाला एक धक्का देऊन, ती हे जाग सोडून निघून गेली. तिचा मृत्यू झाल्यावर तिचे वडील ही बातमी ऐकून कोमामध्ये गेले. आमचे कार्यसंघ सदस्य मनोज मेहरा उर्फ ​​मनोज स्टिलवाला यांनी तिच्या वडिलांची आणि तिच्या कुटुंबाची मदत करण्यासाठी पुढाकार घेतला, खासकरुन जेव्हा ते त्यांची स्थिती चांगली नव्हती. कार्तिक आर्यन,  परिणीती चोप्रा, अग्रगण्य चित्रपटाचे प्रसिद्ध लेखक पराग देसाई आणि एक तरुण चित्रपट निर्माता आणि अभिनेता यांनी आर्थिक मदत दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सॉरी, आरती आम्ही तेव्हा काहीच करू शकलो नाही. परंतु, आम्ही तुझ्या वाढदिवशी तुझी आठवण काढत आहोत आणि आमची इच्छा आहे की तू जिथे असशील, तिथे नेहमी आनंदी आणि खुश राहा.’

बॉलिवूड कलाकार आले मदतीला

आरती आणि तिच्या कुटुंबाला या धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांनी मोलाचे सहकार्य केले. मनोज मेहरा यांनी  आरतीच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी सगळ्यांना आवाहन केले होते. लेखक पराग देसाई यांनी देखील या त्यांना मदतीचा हात दिला.

(Film journalist Aarti Patole died due to corona infection)

हेही वाचा :

Rhea Chakraborty | सुशांतच्या मृत्युनंतर रिया चक्रवर्तीने धरलाय ‘या’ अभिनेत्याचा हात, एकत्र एन्जॉय करतायत पार्टी!

Ira Khan | बॉयफ्रेंडसोबत फोटो शेअर करत आमीरची लेक म्हणतेय, ‘लॉकडाऊनसाठी तयार आहोत!’

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.