August OTT Release: ऑगस्टमध्ये ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका; ‘हे’ चित्रपट आणि सीरिज येणार प्रेक्षकांच्या भेटीला

ऑगस्ट महिना सिनेप्रेमींसाठी खूप मनोरंजनाचा ठरणार आहे. कारण या महिन्यात अनेक चित्रपट (Movies) आणि सीरिज (Web Series) ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत.

August OTT Release: ऑगस्टमध्ये ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका; 'हे' चित्रपट आणि सीरिज येणार प्रेक्षकांच्या भेटीला
August OTT Release: ऑगस्टमध्ये ओटीटीवर मनोरंजनाचा धमाकाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 10:47 AM

नवीन महिन्याची सुरुवात होताच सिनेप्रेमी नवीन चित्रपट आणि सीरिजची प्रतीक्षा करू लागतात. ऑगस्ट महिना सिनेप्रेमींसाठी खूप मनोरंजनाचा ठरणार आहे. कारण या महिन्यात अनेक चित्रपट (Movies) आणि सीरिज (Web Series) ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. जुलै महिन्यात प्रदर्शित झालेले बरेच चित्रपट हे ऑगस्टमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहेत. त्यामुळे थिएटरमध्ये एखादा चित्रपट पाहायचा राहिल्यास आता प्रेक्षक ओटीटीवर तो पाहू शकतात. ऑगस्ट महिन्यात कोणकोणते चित्रपट आणि सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत, ते पाहुयात..

राष्ट्रकवच ओम प्लॅटफॉर्म- ZEE5 कधी प्रदर्शित होणार?- 1 ऑगस्ट आदित्य रॉय कपूरचा राष्ट्रकवच ओम हा चित्रपट 1 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. आता हा चित्रपट OTT वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 1 ऑगस्टपासून Zee5 वर प्रदर्शित होणार आहे.

डार्लिंग्स प्लॅटफॉर्म- नेटफ्लिक्स कधी प्रदर्शित होणार?- 5 ऑगस्ट जसमीत के रेन दिग्दर्शित कॉमेडी-थ्रिलर चित्रपट ‘डार्लिंग्स’ या महिन्यात OTT वर प्रदर्शित होणार आहे. आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 5 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आलियाशिवाय विजय वर्मा, शेफाली शाह, रोशन मॅथ्यू, विक्रम, इयाना चौधरी हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

हे सुद्धा वाचा

व्हिक्टिम प्लॅटफॉर्म – सोनी लिव्ह कधी प्रदर्शित होणार?- 5 ऑगस्ट ॲक्शन-थ्रिलर ड्रामा तमिळ अँथॉलॉजी फिल्म ‘व्हिक्टिम’ येत्या 5 ऑगस्ट रोजी सोनी लिव्हवर रिलीज होणार आहे. व्यंकट प्रभू, पा रंजित, एम राजेश आणि चिंबू देवन यांनी अँथॉलॉजीचे चार खंड दिग्दर्शित केले आहेत. या चित्रपटात प्रसन्ना, आमला पॉल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

खुदा हाफिज 2 प्लॅटफॉर्म- ZEE5 कधी प्रदर्शित होणार?- 8 ऑगस्ट 8 जुलै रोजी विद्युत जामवालचा नवा चित्रपट खुदा हाफिज 2 चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. 30 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. मात्र ओटीटीवर विद्युत जामवालच्या चाहत्यांसाठी तो उत्तम मनोरंजन करणारा ठरेल. 8 ऑगस्ट रोजी हा चित्रपट Zee5 वर प्रदर्शित होईल.

आय एम ग्रुट प्लॅटफॉर्म- डिस्ने प्लस हॉटस्टार कधी प्रदर्शित होणार?- 10 ऑगस्ट मार्व्हल स्टुडिओजची नवीन सीरिज ‘आय एम ग्रूट’ डिस्ने प्लस हॉटस्टारवर 10 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. अनेक मार्व्हल चित्रपटांमध्ये दिसणार्‍या ग्रुट नावाच्या पात्राबद्दल एक संपूर्ण सीरिज तयार केली आहे. त्याचा पहिला अध्याय या महिन्यात प्रदर्शित होत आहे.

इंडियन मैचमेकिंग (सिझन 2) प्लॅटफॉर्म- नेटफ्लिक्स कधी प्रदर्शित होणार?- 12 ऑगस्ट नेटफ्लिक्सच्या इंडियन मॅचमेकिंग या रिॲलिटी शोचा दुसरा सिझन 12 ऑगस्टला रिलीज होणार आहे. या सीरिजच्या पहिल्या सिझनला चाहत्यांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. आता दुसऱ्या सिझनला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं रंजक ठरणार आहे.

हिट द फर्स्ट प्लॅटफॉर्म- ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ कधी प्रदर्शित होणार?- 15 ऑगस्ट नुकताच प्रदर्शित झालेला राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा ​यांचा चित्रपट ‘हिट द फर्स्ट’देखील ऑगस्ट महिन्यात OTT वर प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. 15 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता OTT वर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होईल. राजकुमार आणि सान्या मल्होत्रा ​​व्यतिरिक्त या तेलुगू चित्रपटाच्या या रिमेकमध्ये जतिन गोस्वामी, अखिल अय्यर, मिलिंद गुणाजी, शिल्पा शुक्ला, दलीप ताहिल आणि संजय नार्वेकर यांच्याही भूमिकेत आहेत.

शाबाश मिट्ठू प्लॅटफॉर्म-नेटफ्लिक्स कधी प्रदर्शित होणार?- 15 ऑगस्ट महिला क्रिकेटर मिताली राजच्या जीवनावर आधारित शाबाश मिट्ठू हा चित्रपट 15 जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात मिताली राजची भूमिका तापसी पन्नूने साकारली आहे. हा चित्रपट 15 ऑगस्टपासून OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होईल.

द वॉरियर प्लॅटफॉर्म-डिस्ने प्लस हॉटस्टार कधी प्रदर्शित होणार?- 15 ऑगस्ट ‘एन. ‘लिंगू स्वामी’ दिग्दर्शित ‘द वॉरियर’ हासुद्धा ऑगस्ट महिन्यात रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेता राम पथोनेनी पोलिसाच्या मुख्य भूमिकेत दिसला होता. अॅक्शन आणि थ्रिलरने भरलेला हा चित्रपट 15 ऑगस्टला डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

शी-हल्क प्लॅटफॉर्म- डिस्ने प्लस हॉटस्टार कधी प्रदर्शित होणार?- 17 ऑगस्ट ‘मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’मधील सर्वात शक्तिशाली सदस्य ‘हल्क’ची बहिण ‘शी-हल्क’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर 17 ऑगस्टपासून इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये ही वेब सीरिज पाहता येणार आहे.

नेवर हॅव आय एव्हर प्लॅटफॉर्म- नेटफ्लिक्स कधी प्रदर्शित होणार?- 19 ऑगस्ट ‘नेव्हर हॅव आय एव्हर’चा पहिला सिझन 27 एप्रिल 2020 रोजी आणि दुसरा सिझन 1 जुलै 2021 रोजी रिलीज झाला. ही सीरिज प्रेक्षकांमध्ये प्रचंड गाजली आणि तेव्हापासून प्रत्येकजण त्याच्या तिसऱ्या सिझनची आतुरतेने वाट पाहत होता. या लोकप्रिय सीरिजचा तिसरा सीझन येत्या 19 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

एंडोर – द स्टार वार्स प्लॅटफॉर्म- डिस्ने प्लस हॉटस्टार कधी प्रदर्शित होणार?- 22 ऑगस्ट एंडोर – द स्टार वॉर्स हा ‘स्टार वॉर्स’मधील पहिला सिझन आहे, जो डिस्ने प्लस हॉटस्टारवर 31 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.