Gadar 2 | ‘गदर 2’च्या दिग्दर्शकाचा अत्यंत मोठा खुलासा, लोकांनी केलेल्या आरोपांवर पहिल्यांदाच बोलताना दिसले अनिल शर्मा
गदर 2 हा चित्रपट धमाका करताना दिसत आहे. गदर 2 चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर केले आहेत. गदर 2 चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये अत्यंत मोठे खुलासे करताना अनिल शर्मा हे दिसले आहेत. आता यामुळे ते जोरदार चर्चेत आहेत.

मुंबई : सनी देओल याचा गदर 2 (Gadar 2) हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसत आहे. चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर केले आहेत. सनी देओल याच्या चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे 22 वर्षांनंतरही प्रेक्षकांनी गदर 2 ला प्रेम दिले आहे. गदर 2 हा चित्रपट 11 आॅगस्ट रोजी रिलीज झालाय. सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेल या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. विशेष म्हणजे या चित्रपटाने आतापर्यंत अनेक रेकाॅर्ड तोडण्यासही सुरूवात केलीये. सनी देओल या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसला.
गदर 2 हा चित्रपट फुल धमाका करत आहे. नुकताच गदर 2 चित्रपटाने जगभरातून 522 कोटींच्या आसपास कमाई केलीये. विशेष म्हणजे अजूनही गदर 2 चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. विकेंडला चित्रपट धमाका करेल असेही सांगितले जात आहे. चित्रपट आरामात 600 कोटींचा टप्पा पार करेल असा विश्वास निर्मात्यांना आहे.
नुकताच आता गदर 2 चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी चित्रपटाच्या बजेटबद्दल अत्यंत मोठा खुलासा हा केला आहे. अनिल शर्मा म्हणाले की, अनेक लोकांना वाटत होते की, गदर 2 हा चित्रपट तयार होणार नाही आणि झाला तरीही लोक या चित्रपटाला प्रतिसाद देणार नाहीत. मात्र, सर्व काही गोष्टी नक्कीच उलट्या झाल्या.
विशेष म्हणजे या चित्रपटासाठी खूप मोठे बजेट हे नक्कीच नव्हते. गदर 2 चित्रपट तयार करण्यासाठी आम्हाला 60 कोटी खर्च आला आणि बाॅक्स आॅफिसवर चित्रपट आता लवकरच 600 कोटींचा टप्पा गाठणार आहे. यावरून हे स्पष्ट झाले की, गदर 2 हा चित्रपट हिट ठरलाय. यासोबत अनिल शर्मा यांनी अजूनही काही मोठे खुलासे हे केले आहेत.
बऱ्याच लोकांना असेही वाटत होते की, गदर 2 चित्रपटात सनी देओल हा काम करणार नाही. उत्कर्ष नवीन आहे. इतकेच नाही तर तोपर्यंत सिमरत आणि मनीष वाधवा चित्रपटाशी जोडले गेले नव्हते. अनेकांना वाटत होते की, हा चित्रपट मी माझ्या मुलासाठी बनवत आहे. परंतू गदर हा एक ब्रँड आहे, अत्यंत कमी बजेटमध्ये तयार झालेल्या गदर 2 ने धमाला केला आहे.