Sunny Deol | ‘हिम्मत असेल तर समोर या आणि…’, कोणावर आणि का भडकले सनी देओल?
'गदर २' फेम सनी देओल यांनी कोणाला दिली धमकी... अनेक वर्षांनंतर अभिनेत्याने 'त्या' व्यक्तींवर संताप व्यक्त केलाच... सध्या सर्वत्र सनी देओल यांची चर्चा
मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : अभिनेते सनी देओल सध्या आगामी ‘गदर २’ सिनेमामुळे चर्चेत आहेत. सध्या सर्वत्र ‘गदर २’ सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. अनेक सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेले सनी देओल यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. फक्त भारतातच नाही तर, परदेशात देखील सनी देओल यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक असतात. सोशल मीडियावर देखील सनी देओल यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. पण अभिनेत्याला ट्रोल करणऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
नुकताच झालेल्या मुलाखतीत सनी देओल यांनी ट्रोलर्सवर निशाणा साधला आहे. सनी देओल म्हणाले, ‘मी ट्रोलिंगला घाबरत नाही. ते खरे चेहरे नाहीत, ते कायम टीका करणारे लोक आहेत. त्यांना काही काम नाही, म्हणून काहीही लिहितात आणि ट्रोल करतात. मूर्खांच्या या जगात, लोक एकमेकांना मूर्ख बनवतात… तंत्रज्ञानाचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत.’
‘काही लोक तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करतात. मला देखील अनेकदा ट्रोल केलं, पण मी कमेंट करणंच बंद केलं आहे. त्यांच्याकडे हिम्मत असेल तर त्यांनी समोर यावं आणि बोलावं…’ असं म्हणत सनी देओल ट्रोल करणाऱ्यांवर भडकलेच.
चाहत्यांबद्दल देखील सनी देओल याने मोठं वक्तव्य केलं. फक्त भारतात नाही तर, सनी देओल यांचे चाहते पाकिस्तानमध्ये देखील आहेत. ‘गदर’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांनी विरोध दर्शवला होता. पण पाकिस्तानमध्ये देखील सनी देओल याचे चाहते आहेत.
एका मुलाखतीत सनी म्हणाला, ‘खऱ्या जणतेमध्ये असं वातावरण नाही. मी जेव्हा पाकिस्तानमध्ये जातो, तेव्हा चाहत्यांना भेटतो.’ सध्या सर्वत्र सनी देओल यांची चर्चा रंगत आहे. ‘गदर २’ सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने सनी देओल अनेक गोष्टींचा खुलासा करताना दिसत आहेत.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ११ ऑगस्ट रोजी सनी देओल याच्या ‘गदर २’ सिनेमासोबत, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार स्टारर ‘ओएमजी २’ सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. दोन्ही सिनेमे दमदार असल्यामुळे कोणता सिनेमा बॉक्स ऑफिसवर बाजी मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या सर्वत्र ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.