छेड काढणाऱ्या तरुणाला गौतमी पाटीलची मारहाण? भर कार्यक्रमातील मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
सध्या सोशल मीडियावर गौतमी पाटीलची चाहत्याला मारहाण असं कॅप्शन लिहून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Gautami Patil Viral Video : सध्या सोशल मीडियावर फक्त एकाच नावाची चर्चा आहे. ती म्हणजे डान्सर गौतमी पाटीलची. काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात डान्सर गौतमी पाटीलचे (Gautami Patil ) व्हिडीओ धुमाकूळ घालत आहेत. गौतमीने आपल्या डान्स आणि लावणीच्या माध्यमातून राज्यभरातील तरुणांना आकर्षित केलं आहे. सर्वात कमी कालावधीमध्ये सुप्रसिद्ध झालेली ही पहिली डान्सर आहे. त्यामुळे गौतमीच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात चाहत्यांची गर्दी असते.
छेड काढणाऱ्या तरुणाला गौतमी पाटीलची मारहाण?
सध्या सोशल मीडियावर गौतमी पाटीलची चाहत्याला मारहाण असं कॅप्शन लिहून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आपल्याला दिसत आहे की मोठ्या प्रमाणात गर्दी डान्सच्या कार्यक्रमाला गर्दी झाली आहे. याच गर्दीचा फायदा घेत एका तरुणाने नृत्यांगनाची छेड काढण्याचा प्रयत्न केला आहे.
या वेळी त्या नृत्यांगनाने त्या तरुणाला जागीच चोप दिला असल्याचं आपल्याला या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये गौतमी पाटील असल्याचा काहीजणांनी दावा केला आहे. पण हा व्हिडीओमध्ये गौतमी पाटील असल्याची अद्याप कुठेही माहिती आलेली नाही.
पहा व्हिडीओ