AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ह्योच दादला हवा… ! गौतमी पाटीलला कसा नवरा हवाय ? व्यक्त केल्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा

नृत्यांगना गौतमी पाटीलने तिच्या जोडीदाराविषयीच्या अपेक्षा सांगितल्या आहेत. लग्नासाठी कसा मुलगा हवा, हेही गौतमीने नमूद केले आहे.

ह्योच दादला हवा... ! गौतमी पाटीलला कसा नवरा हवाय ? व्यक्त केल्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा
गौतमी पाटीलImage Credit source: instagram
| Updated on: Apr 10, 2023 | 9:08 AM
Share

मुंबई : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्याबद्दल बरीच चर्चा सुरू असते. वेगवेगळ्या प्रतिक्रिया, कॉमेंट्स , काही वाद सतत तिच्याभोवती फिरत असतात. तरूणाईला वेड लावणाऱ्या गौतमीवर लाखो लोक फिदा आहेत. टीका होवो किंवा कौतुक, गौतमी तिचं काम करत ठाम उभी आहे. सध्या गौतमी पुन्हा चर्चेत आली आहे. पण यावेळेस कारण काही वेगळंच आहे. सर्वांना भुरळ घालणाऱ्या गौतमीच्या लग्नाबद्दल (marriage) सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गौतमीने तिच्या आयुष्याच्या जोडीदाराबद्दल (expectation about life partner) काय अपेक्षा आहेत ते सांगितल्या आहेत. आपल्याला लग्नासाठी कसा मुलगा हवाय हेही गौतमीनं नमूद केलं आहे.

गौतमीने नुकतीच एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली आहे. यामध्ये तिने तिच्या आयुष्याविषयी बोलतानाच, लग्नाबद्दल आणि कसा नवरा हवा याबद्दल भाष्य केलं आहे. ‘ माझं आयुष्य काही सरळसोपं नाही, थोडं खडतरच गेलं. माझं शालेय शिक्षण मुलींच्या शाळेत झालं आहे. बाबाचं लवकर निधन झालं त्यानंतर घरी कोणीच पुरुष नव्हता. ना वडील ना भाऊ, ना नातेवाईक. त्यामुळे घरची जबाबदारी मी माझ्या खांद्यांवर उचलली. माझा कोणत्याही पुरुषाशी फारसा संबंधही आलेला नाही. मी खूप काळापासून काम करत्ये, घराची जबाबदारी पेलत्ये. त्यामुळे आता घरातल्या जबाबदाऱ्यांचा अर्धा वाटा उचलण्यासाठी तरी एक पुरुष आयुष्यात असायला हवा, असं मला वाटतं. या ओझ्यातून थोडं मोकळं व्हायची माझी इच्छा आहे, त्यासाठी मला लग्न करण्याची इच्छा आहे’ असं गौतमीने नमूद केलं.

जोडीदाराबद्दल अपेक्षा काय आहेत, लग्नासाठी कसा मुलगा हवा असा प्रश्न विचारला असता गौतमी म्हणाली , ‘ मला पैसा, प्रतिष्ठा, बंगला नकोय. त्याची काही हाव नाही. पण माझ्या आयुष्यात जी परिस्थिती येईल, त्याला सामोरं जाण्यासाठी, त्यात साथ देईल असा माझा जोडीदार असावा, असं मला वाटतं. जेव्हा असा एखादा मुलगा मला मिळेल, तेव्हा मी लग्नाचा विचार करेन. आत्ता मी 25 वर्षांची आहे, अजून माझं लग्न झालेलं नाही, पण मलाही लवकरच लग्नबंधनात अडकण्याची इच्छा आहे. ‘

गौतमी पाटीलवर एकीकडे मोठ्या प्रमाणात टीका होत असते. पण तरीही लाखो चाहत्यांमध्ये तिची क्रेझ कायम आहे. तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला राडा होत असतो. पण तरीही तरुण मंडळी तिच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित असतात. गौतमीने पहिल्यांदाच तिने लग्नाबद्दल आणि जोडीदाराविषयीच्या अपेक्षांबद्दल भाष्य केलं आहे.

रुपेरी पडद्यावर झळकणार गौतमी

दरम्यान, गौतमी पाटील हिच्या पहिल्यावहिल्या घुंगरू या मराठी सिनेमाचा टीझर लॉन्च झाला आहे. घुंगरू या सिनेमाचे चित्रीकरण महाराष्ट्रासह परराज्यात झालं होतं. सोलापूर जिल्ह्यात या सिनेमाचं सर्वाधिक चित्रीकरण झालं. लोककलावंतांच्या समस्यांवर आधारीत असलेला हा सिनेमा महिनाभरात प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन बाबा गायकवाड यांनी केलंय. तर सिनेमात गौतमीची प्रमुख भूमिका आहे. आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमाची गौतमीला प्रचंड उत्सुकता आहे. तिच्यासह तिच्या चाहत्यांनाही तिच्या सिनेमाची उत्सुकता लागली आहे.

ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.