Ghum Hai Kisikey Pyaar Meiin | मालिकेत एकमेकींच्या सवत; खऱ्या आयुष्यातही केलं अनफॉलो, अभिनेत्रींचा वाद चव्हाट्यावर

आयेशा आणि ऐश्वर्या यांच्यामधील भांडणाचं खरं कारण अद्याप समोर आलं नाही. या दोघींनीही त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र नेटकऱ्यांनी त्यावरून विविध अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली आहे. 'आयेशा आणि ऐश्वर्याने एकमेकींना अनफॉलो केलंय. विचार करा सेटवर कसा माहौल असेल.

Ghum Hai Kisikey Pyaar Meiin | मालिकेत एकमेकींच्या सवत; खऱ्या आयुष्यातही केलं अनफॉलो, अभिनेत्रींचा वाद चव्हाट्यावर
Ayesha Singh and Aishwarya Sharma Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 01, 2023 | 8:43 AM

मुंबई : स्टार प्लस वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘गुम है किसी के प्यार में’ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. या मालिकेत पत्रलेखा ऊर्फ पाखीची भूमिका साकारणारी अभिनेत्री ऐश्वर्या शर्माने मालिका सोडल्यानंतर कथेत नवा ट्विस्ट आला. मात्र त्याचसोबत यामध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या दोन अभिनेत्रींमधील शीतयुद्ध आता चर्चेचा विषय ठरला आहे. या मालिकेत सईची भूमिका साकारणारी आयेशा सिंह आणि ऐश्वर्या शर्मा यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. या दोघींमधील भांडणाने आता नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. विशेष म्हणजे मालिकेतही या दोघींच्या भूमिका एकमेकांच्या विरोधातील होत्या.

मालिकेच्या सुरुवातीपासूनच ऐश्वर्या आणि आयेशा यांच्यात कधी खास मैत्री झाली नव्हती. ऐश्वर्या आणि आयेशाने मालिकेत एकमेकांच्या सवतीची भूमिका साकारली आहे. या दोघांच्या पतीच्या भूमिकेत असलेला अभिनेता नील भट्ट हा ऐश्वर्याचा खऱ्या आयुष्यातील पती आहे. ‘गुम है किसी के..’ मालिकेत काम करताना सेटवर हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि लॉकडाउनदरम्यान त्यांनी लग्न केलं. नील आणि ऐश्वर्याची लव्ह-स्टोरी सुरू झाल्यानंतर आयेशाने त्यांच्यापासून लांब राहणंच पसंत केलं, असं म्हटलं जातं. यानंतर दोघींमध्ये शीतयुद्ध सुरू झालं.

हे सुद्धा वाचा

आता ऐश्वर्या आणि आयेशाने एकमेकांना सोशल मीडियावरदेखील अनफॉलो केलं आहे. या मालिकेत काही वर्षांचा लीप दाखवण्यात येणार आहे. त्यानंतर नील भट्टसुद्धा मालिका सोडणार असल्याचं कळतंय. तेव्हा नीलसुद्धा आयेशाला अनफॉलो करेल, असाही अंदाज काहींनी वर्तवला आहे.

आयेशा आणि ऐश्वर्या यांच्यामधील भांडणाचं खरं कारण अद्याप समोर आलं नाही. या दोघींनीही त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र नेटकऱ्यांनी त्यावरून विविध अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली आहे. ‘आयेशा आणि ऐश्वर्याने एकमेकींना अनफॉलो केलंय. विचार करा सेटवर कसा माहौल असेल. आयेशाला किती त्रास सहन करावा लागत असेल’, असं एकाने लिहिलं. तर ‘कोणत्या गोष्टीचा त्रास? ऐश्वर्याने आयेशाच्या हक्काचे पैसे स्वत: घेतले होते का? किंवा निर्मात्यांशी बोलून तिने आयेशाची फी कमी केली होती का’, असा उपरोधिक सवाल दुसऱ्या युजरने केला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.