बॉलिवूडची दिलबर गर्ल अर्थात अभिनेत्री नोरा फतेही सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करतेय. आता नुकतंच तिनं काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये ती अत्यंत सुंदर लूकमध्ये दिसत आहे. अर्थात यावेळीही ती एका वेगळ्या स्टाईलमध्ये दिसली आहे.
हे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'हाय गर्मी'...तिचे हे फोटो चाहत्यांना घायाळ करत आहेत.
व्हाईट आणि स्काय ब्लू बेस्ड फॅब्रिकवर रिच सेक्विन वर्क असलेला हा ड्रेस नोरानं कॅरी केलय, ज्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
नोरा फतेहीलं कॅरी केलेला हा ड्रेस प्रसिद्ध फॅशन डिझायनर नईम खान यांनी डिझाइन केला आहे. नईम एक भारतीय-अमेरिकन डिझायनर आहे, ज्याचे कपडे बॉलीवूडपासून ते हॉलीवूडपर्यंतच्या अभिनेत्रींनी परिधान केले आहेत.
या ड्रेससह नोराने आपल्या लूकला पूरक करण्यासाठी ओले केस आणि न्यूड मेकअप केला. यामुळे नोरा आणखीनच हॉट दिसत होती.
नोरा फतेहीचा हा हॉट लूक तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कमेंट्सचा पाऊस पडतोय.