चिमुकले थिरकत असलेलं ‘नाटू नाटू’ गाणं कसं झालं तयार; काय आहे इतिहास?

‘नाटू नाटू’ गाणं लागलं तर लहान मुलं मोठ्या उत्साहाने डान्स करतात; पण हे गाणं कसं झालं तयार?

चिमुकले थिरकत असलेलं ‘नाटू नाटू’ गाणं कसं झालं तयार; काय आहे इतिहास?
RRR Song `Naatu Naatu`
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 11:16 AM

RRR Song `Naatu Naatu`: ‘आरआरआर’ (rrr ) सिनेमातील ‘नाटू-नाटू’ (naatu naatu) गाण्याने विक्रम चरला आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येक जण ‘नाटू-नाटू’ गाणं लागलं तर थिरकू लागतो. पण हे गाणं कसं तयार झालं, कोणी तयार केलं, या प्रसिद्ध गाण्याला तयार करायला किती वेळ लागला? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर आज जाणून घेवू जगप्रसिद्ध ‘नाटू-नाटू’ गाण्यामागचा इतिहास. गाण्यात एनटीआर-रामचरण यांच्या दमदार डान्सने तर सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. (naatu naatu song wins golden globe award)

एनटीआर-रामचरण दोघे उत्तम डान्सर आहेत. सिनेमाचे दिग्दर्शक राजामौली यांच्या लक्षात आलं की एनटीआर-रामचरण दोघे तेलूगू इंडस्ट्रीमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे दमदार गाण्यावर दोघांचा भन्नाट डान्स असेल, तर प्रेक्षकांचं मनोरंजन होईल. म्हणून संगीतकार किरावानी यांनी गाणं तयार करण्याची जबाबदारी गीतकार चंद्रबोस यांच्या खांद्यावर सोपवली.

संगीतकार किरावानी गीतकार चंद्रबोस यांना म्हणाले, तुम्हाला हवं ते लिहा पण लक्षात ठेवा सिनेमा १९२० सालच्या घटनांभोवती फिरत आहे. म्हणून अशा शब्दांचा वापर करा, जे १९२० सालच्या घटनांवर आधारलेले असतील. त्यानंतर चंद्रबोस यांनी गाण्यावर काम करण्यास सुरुवात केली.

एकदा चंद्रबोस कारमधून एल्यूमीनियम फॅक्ट्रीहून जुबिली हिल्स याठिकाणी जात होते. गाडी चालवताना त्याच्या मनात ‘नाटू-नाटू’ गाण्याची हुक लाईन सुचली. या गाण्यावर अद्याप कोणतीही धून तयार झाली नसली तरी चंद्रबोस यांनी गाण्याचे २-३ मुखडे तयार केले होते आणि किरवाणी यांची भेट घेतली.

चंद्रबोस यांनी तयार केलेलं गाणं किरवणी यांनाही आवडलं. जवळपास २ दिवसात जवळपास 90 टक्के गाणं तयार झालं. मात्र अनेक बदलांनंतर गाण पूर्ण व्हायला 19 महिने लागले. गाण्यात 1920 च्या दशकातील आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील भाषांमधील शब्द वापरण्यात आले आहेत.

आज जगप्रसिद्द झालेलं गाणं कालभैरव आणि राहुल सिपलीगुंज यांनी गायलं. गाणं शूट करायला बराच वेळ लागला. युक्रेनच्या प्रेसिडेंशियल पॅलेसच्या बॅकग्राउंडमध्ये ‘नाटू-नाटू’ गाण्याचं शुटिंग करण्यात आलं. RRR मधील नाटू नाटू या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार जिंकला आहे.

हॉलिवूडमधील अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार जिंकणारा हा भारतातील पहिला चित्रपट ठरला आहे. या पुरस्कार सोहळ्याला दिग्दर्शक एस. एस. राजामौली, ज्युनिअर एनटीआर, रामचरण आणि त्याची पत्नी उपासना यांनी हजेरी लावली.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.