शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगन यांना सरकारकडून नोटीस जारी; कारण जाणून व्हाल हैराण
कायद्याच्या कचाट्यात अडकणार अभिनेता शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगन... काय आहे प्रकरण? सेलिब्रिटींच्या अडचणीत होणार वाढ? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्यांची चर्चा... शाहरुख ,अक्षय आणि अजय यांना सरकारने का जारी केली नोटीस?
मुंबई | 10 डिसेंबर 2023 : अभिनेता शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगन यांना सरकारकडून नोटीस जारी करण्यात आली आहे. पान मसाल्याच्या जाहिरातींमुळे बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पान मसाल्याच्या जाहिरातीचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाच्या अवमान याचिकेवर केंद्र सरकारने उत्तर दिलं आहे. पान मसाला जाहिरात प्रकरणी शाहरुख, अजय आणि अक्षय कुमार यांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाला दिली आहे. सध्या सर्वत्र याप्रकरणी चर्चा रंगली आहे.
पान मसाल्याच्या जाहिराती प्रकरणी केंद्र सरकारच्या वकिलांच्या म्हणण्यानूसार, सर्वोच्च न्यायालयातही या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्यासाठी पुढील सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. 9 मे 2024 याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान यांच्या खंडपीठाने याचिकेवर हा आदेश दिल्याची माहिती समोर येत आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
सांगायचं झालं तर, पान मसालाच्या जाहिरातींमध्या काम करणाऱ्या शाहरुख, अक्षय आणि अदेय देवगन या तिघांनाही पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. असं असताना अभिनेत्यांनी अशा जाहिरातींमध्ये काम करणं तरुणांसाठी योग्य नाही… अशा वक्तव्य याचिका दाखल करणारे वकील मोतीलाल यादव यांनी केलं आहे. ‘सेलिब्रिटींनी असं केल्यामुळे लोकांचा भ्रमनिरास होत आहे…’ असं देखील मोतीलाल यादव म्हणाले. आता याप्रकरणी पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अभिनेता शाहरुख खान याचा आगामी सिनेमा
यंदाच्या वर्षी शाहरुख खान याने बॉलिवूडला दोन हीट सिनेमे दिले. किंग खान स्टारर ‘पठाण’ सिनेमा वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झाला आणि सिनेमाने फक्त भारतात नाही तर, जगभरात नवीन विक्रम रचले. सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री दीपिका पादुकोन हिच्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. पण त्याच्या सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवर कोणताही परिणाम झाला आहे..
‘पठाण’ सिनेमानंतर शाहरुख खान ‘जवान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला. ‘जवान’ सिनेमाने देखील बॉक्स ऑफिसवर तुफान मजल मारली. आता किंग खान ‘डंकी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आता चाहते ‘डंकी’ सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे.