Gulshan Kumar | गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी घेतलं होतं ताब्यात; अभिनेत्याचा मोठा खुलासा

गुलशन कुमार यांची 12 ऑगस्ट 1997 रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अंधेरी पश्चिम इथल्या जीत नगर परिसरातील एका शिव मंदिराबाहेर 16 गोळ्या झाडून त्यांनी हत्या झाली होती.

Gulshan Kumar | गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी घेतलं होतं ताब्यात; अभिनेत्याचा मोठा खुलासा
Gulshan Kumar and Manav KaulImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 22, 2023 | 10:13 AM

मुंबई : ‘तुम्हारी सुलू’, ‘जॉली एलएलबी 2’, ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ आणि ‘अजीब दास्तान’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेला अभिनेता मानव कौल चांगलाच लोकप्रिय आहे. मात्र इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. मानवने थिएटरपासून करिअरची सुरुवात केली होती. मात्र टी-सीरिज निर्मित ‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटाची ऑफर मिळाल्यानंतर तो जेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचला, तेव्हा जणू पायात त्राणच उरला नव्हता. टी-सीरिजच्या ऑफिसमध्ये गुलशन कुमार यांचा मोठा फोटो लावण्यात आला होता. त्या फोटोला पाहून मानवला त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण झाली, ज्यावेळी त्याला गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

मानव कौलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गुलशन कुमार यांच्या हत्येनंतरच्या आठवणींना उजाळा दिला. मानवने सांगितलं की त्याला चित्रपटांमध्ये काम करायचं होतं, मोठा अभिनेता व्हायचं होतं. मात्र हे सर्व होण्याआधीच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्याच्या सर्व स्वप्नांवर पाणी फेरलं होतं.

दहिसरची घटना, स्ट्रगलिंगचे दिवस

मानव कौलने सांगितलं की तो काही मुलांसोबत दहिसरमधल्या एका रुममध्ये राहायचा. स्ट्रगलिंगच्या काळात पैशांची कमतरता होती. त्यामुळे तो रात्री उशिरापर्यंत जागायचा. जेणेकरून दुसऱ्या दिवशी नाश्त्याचे पैसे वाचतील आणि थेट जेवण करावं लागेल. रुममध्ये राहणारी सर्व मुलं चित्रपटात काम करण्यासाठी विविध स्टुडिओमध्ये फेरफटका मारायचे आणि एकत्र इकडे-तिकडे फिरायचे. हे सर्वजण नेमकं काय करतात, असा प्रश्न अनेकांना पडायचा. याचदरम्यान एक मोठी घटना घडली. टी-सीरिजचे मालक गुलशन कुमार यांची एकाने गोळी झाडून हत्या केली होती.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी घेतलं ताब्यात

“गुलशन कुमार यांच्या हत्येनंतर पोलीस लोकांना उचलून घेऊन जायची. जेव्हा एके रात्री मी माझ्या मित्रांसोबत पत्ते खेळत होतो, तेव्हा पोलीस तिथे आली होती आणि त्यांनी मलासुद्धा ताब्यात घेतलं होतं. ताब्यात घेण्याआधी पोलिसांनी आम्हाला हा प्रश्न विचारला होता की, गुलशन कुमार यांना कोणी मारलं? माझ्यासोबत असलेली दोन-तीन मुलं खूप घाबरली होती. तर काहींना हसू येत होतं. हे पाहून पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन दहिसर पोलीस ठाण्यात आणलं होतं. पोलीस ठाण्यात एकाने मला विचारलं, “तुझा कोणता कट्टा आहे? तू तर काश्मिरी आहेस.” मी थिएटर कलाकार आहे हे त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच चौकशीनंतर अखेर त्यांनी आम्हाला सोडलं,” अशी घटना त्याने सांगितली.

गुलशन कुमार यांची हत्या

गुलशन कुमार यांची 12 ऑगस्ट 1997 रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अंधेरी पश्चिम इथल्या जीत नगर परिसरातील एका शिव मंदिराबाहेर 16 गोळ्या झाडून त्यांनी हत्या झाली होती.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.