Oscars 2023 : कोण आहेत ‘त्या’ दोन महिला, ज्यांनी भारताला मिळवून दिला पहिला ऑस्कर पुरस्कार?

Oscars 2023 : भारतातील 'या' दोन महिलांनी रचला नवा इतिहास; जाणून घेऊया अशा दोन महिलांबद्दल ज्यांनी परदेशात भारताच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

Oscars 2023 : कोण आहेत 'त्या' दोन महिला, ज्यांनी भारताला मिळवून दिला पहिला ऑस्कर पुरस्कार?
Follow us
| Updated on: Mar 13, 2023 | 11:32 AM

Oscars 2023 : यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतासाठी अत्यंत खास ठरला आहे. ‘द एलीफेंट विस्पर्स’ (The Elephant Whisperers) या सिनेमाने ऑस्कर पुरस्कार आपल्या नावावर केला आहे. एवढंच नाही तर, RRR सिनेमातील नाटू नाटू गाण्याने देखील विश्वविक्रम रचला आहे. पण सर्वात प्रथम देशाला ऑस्कर पुरस्कार मिळवून देणारा ‘द एलीफेंट विस्पर्स’ सिनेमा ठरला आहे. तर आज जाणून घेवू अशा दोन महिलांबद्दल ज्यांनी परदेशात भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. भारताला यंदाच्या वर्षा तीन सिनेमांकडून अपेक्षा होती.

एकीकडे ‘ऑल दॅट ब्रीदस’ सिनेमा सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री फीचर फिल्म विभागात ऑस्कर जिंकू शकला नाही, तर दुसरीकडे ‘द एलिफंट व्हिस्पर्सने’ सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट विभागात ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ सिनेमाचं दिग्दर्शन कार्तिकी गोंजाल्विस यांनी केलं आहे, तर सिनेमाची निर्मिती गुनीत मोंगा यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

तर खास दिवसाचं औचित्य साधत कार्तिकी गोंजाल्विस आणि गुनीत मोंगा यांच्याबद्दल जाणून घेवू. ज्यांनी जगभरात भारताचं नाव मोठं केलं आहे. गुनीत मोंगा या भारतीय निर्मात्या आहेत. त्यांनी अनेक सिनेमांची निर्मिती केली आहे. गुनीत मोंगा यांनी निर्मित केलेल्या सिनेमांना याआधी देखील सन्मानित करण्यात आलं आहे. पण ‘द एलिफंट व्हिस्पर्सने’ सिनेमाची निर्मिती करत त्यांनी इतिहास रचला आहे.

‘द एलिफंट व्हिस्पर्सने’ सिनेमाला देशातील पहिला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. गुनीत मोंगा यांनी दसवेदानियां, वन्स अपऑन अ टाइम इन मुंबई, गँग्स ऑफ वासेयपुर, शाहिद, द लंच बॉक्स, मिक्की वायरस, मानसून शूटआउट आणि हरामखोर यांसारख्या सिनेमांची निर्मिती केली आहे.

कोण आहेत कार्तिकी गोंजाल्विस? ‘द एलिफंट व्हिस्पर्सने’ दिग्दर्शन कार्तिकी गोंजाल्विस यांनी केलं आहे. कार्तिकी गोंजाल्विस हे कलाविश्वातील नवं नाव आहे. पण आता या नावाची ख्याती जगभरात पसरली आहे. कार्तिकी गोंजाल्विस यांनी सिनेमात प्राण्यांप्रति असलेली त्यांची आपुलकी आणि संवेदनशीलता  सिनेमाच्या माध्यमातून मांडली आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘द एलिफंट व्हिस्पर्सने’ सिनेमाला यंदाच्या वर्षी ऑस्कर पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं आहे.

लॉस एंजेलिस येथे आयोजित 95 व्या ऑस्कर पुरस्कार 2023 मध्ये संपूर्ण देशाच्या नजरा भारतावर खिळल्या. जेव्हा ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची घोषणा झाली तेव्हापासून कलाकार आणि चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. आज अखेर परदेशात सर्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात भारताचा बोलबाला पाहायला मिळत आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.